घरदेश-विदेशRailway Recruitment 2021: १२ वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, महिना ९३...

Railway Recruitment 2021: १२ वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, महिना ९३ हजार पगार

Subscribe

जर तुम्ही पदवीधर आहात किंवा १२ वी पास आहात तर तुम्हाला रेल्वेत नोकरी मिळण्याची एक सुवर्णसंधी आहे. कारण रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) पश्चिम रेल्वेच्या ग्रुप ‘सी’  पदासाठी भरती सुरु केली आहे. या पदासाठी उमेदवार पश्चिम रेल्वेच्या rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटवरुन ३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतो. स्पोर्ट्स कोट्याच्या माध्यमातून ग्रुप सी च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

RRC पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स कोट्यातून एकूण २१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. ज्या माध्यमातून महिला आणि पुरुष दोघांनाही या पदासाठी अर्ज करत येणार आहे. स्पोर्ट्स कोट्यातील ही भरती प्रक्रिया अनारक्षित आहे. ज्यामुळे OBC, SC, ST वर्गातील कोणत्याही उमेदवाराला भरती प्रक्रियेत आरक्षण मिळणार नाही. रेल्वेने या भरती प्रक्रियेतील पे लेवल ४ आणि ५ पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त युनिर्व्हसिटीमधून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

तर पे लेवल २ आणि ३ साठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. याशिवाय संबंधित खेळात विशेष अधिकृत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या उमेदवाराचे वय १८ ते २५ वयोगटातील असणे गरजेचे आहे. या स्पोर्ट्स कोट्यातील २१ पदांसाठी रेल्वेकडून चांगला पगार दिला जाणार आहे. यातील ५ पदांसाठी लेवल ४/५ साठी २५, ५०० ते ९२,३०० पर्यंत पगार दिला जाईल. तर १६ पदांसाठी लेवल २/३ साठी १९,००० ते ६९,१०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.


Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणारे कोर्टात हजर न झाल्यास थेट मृत्यूदंडाची शिक्षा, तालिबानचा इशारा

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -