घरदेश-विदेशRs 2000 Notes : RBI कडून 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढ

Rs 2000 Notes : RBI कडून 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढ

Subscribe

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने दोन हजार रुपयांच्या नोट बदलण्याची मुदत वाढवली आहे. आरबीआयने 7 ऑक्टोबरपर्यंत बँकेत दोन हजार रुपयांची नोट जमा करता येणार आहे. यासंदर्भात आरबीआयने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. यामुळे आता नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.

यापूर्वी दोन हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याच्या सूचना आरबीआयने दिल्या होत्या. पण आता आरबीआयकडून नोट बदलून घेण्यासाठी आठवड्याभराची वेळ दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2023पर्यंत 96 2000 नोटा बँक जमा झाल्या आहेत. 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआकडे परत आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विदर्भातील आदिवासींचा मंत्री गावितांना नाशिकमध्ये घेराव; बराच वेळ गोंधळाची स्थिती

आरबीआयने नोटा बंद करण्याचा कधी घेतला निर्णय

आरबीआयने 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. यासाठी आरबीआयने बँकेला 4 महिन्यांची मुदत दिली होती. नागरिकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून घेऊ शकता. यासाठी 30 सप्टेंबर ही नोटा बदलण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती. पण आता आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त लवकरच… 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -