घरताज्या घडामोडी'मुंबई पोलीस गप्प का, आम्ही प्रश्न तर विचारणारच'; बिहार पोलीस महासंचालक

‘मुंबई पोलीस गप्प का, आम्ही प्रश्न तर विचारणारच’; बिहार पोलीस महासंचालक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करीत नसल्याचा, आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असतानाच आता, या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, ‘बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करीत नसल्याचा’, आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. गेल्या वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून तब्ब्ल ५० कोटी रुपये काढले गेले. मात्र, गेल्या वर्षात केवळ १५ कोटी रुपये काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे.

सुशांतच्या बँकेतून ५० कोटी काढले

‘गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात ५० कोटी रुपये जमा होते. मात्र, ते सर्व पैसे काढले गेले आहेत. एका वर्षात जर १७ कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले आणि त्यापैकी १५ कोटी रुपये काढले गेले. हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का?’, असा संतप्त सवाल बिहारचे पोलीस महासंचालयक ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुशांतच्या बँक खात्यातून रियाच्या बँक खात्यात कोणतेही पैसे जमा न झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांचा तपास मुंबई पोलीस करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच बिहारच्या आयपीएस अधिकार्‍याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. याप्रकरणी बिहार पोलिसांना निरपेक्षपणे तपास करू द्यावा. मुंबई पोलीस चांगले काम करत आहे. मात्र, कधीकधी राजकीय दबावामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर भूमिकेवर टिका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुशांत सिंह प्रकरण : बिहार पोलिसांची अडवणूक नको


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -