घरअर्थजगतअदानी पोर्ट्सचे 5000 कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जाणार; नेमकं प्रकरण...

अदानी पोर्ट्सचे 5000 कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जाणार; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

अमेरिकन फर्म हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. हिंडनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. या सगळ्याचा आदानी समुहाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.

अमेरिकन फर्म हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. हिंडनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. या सगळ्याचा आदानी समुहाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. अशातच अदानी पोर्ट्सचे 5000 कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जाणार असल्याचे उद्योगपती गौतम अदानी यांचे पूत्र करण अदानी यांनी सांगितले. (rs 5000 crore debt of indias port business to be settled early karan adani)

करण अदानी हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-संचालक आहेत. लवकरच करण अदानी हे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे कर्ज प्रमाण सुधारण्याची योजना आखत आहेत. त्यांची कंपनी संपूर्ण कर्ज फेडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हे 5000 कोटी रुपये वेळेआधीच निकाली काढले जाणार असल्याचे करण अदानी यांनी एका व्हिडीओच्या माध्यामतून संवाद साधताना सांगितले.

- Advertisement -

याआधी अदानी समूहाने सप्टेंबर 2024 पर्यंत 1.1 अब्ज डॉलर्सचे कर्ज प्रीपे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याद्वारे कंपनीला गुंतवणुकदारांना काही संदेश द्यायचा आहे. याचा अर्थ अदानी समूहाची आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आहे. या कर्जाच्या प्रीपेमेंटद्वारे, कंपनी गहाण म्हणून ठेवलेले शेअर्स देखील सोडू शकते. शिवाय शेअर्सच्या बदल्यात घेतलेल्या कर्जाचा वादही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मंगळवारी अदानी पोर्ट्सचा आर्थिक अहवाल थोडा वाईट आला. कंपनीचा डिसेंबर तिमाहीचा निव्वळ नफा 12.94 टक्क्यांनी घसरून 1,336.51 कोटी रुपये झाला. मात्र उत्पन्न वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या तीन महिन्यांतील महसूल जवळपास 17 टक्के वाढला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – श्रीमंतांच्या यादीतून भारतीय गायब, अदानींनंतर अंबानीही आऊट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -