घरदेश-विदेशदेशभरात चौथ्या टप्प्यापर्यंत ७८५ कोटींची रोकड, २४९ कोटींची दारू जप्त

देशभरात चौथ्या टप्प्यापर्यंत ७८५ कोटींची रोकड, २४९ कोटींची दारू जप्त

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. मात्र निवडणुकीच्या काळात तब्बल ३२७४ कोटींची मालमत्ता सोमवारपर्यंत जप्त केल्याची माहिती आयोगाने दिली आहे. यामध्ये ७८५.२६ कोटींची रोकड आणि २४९.०३८ कोटींची दारू जप्त करण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत देशातील ७२ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या तपासणीत एकूण ७८५.२६ कोटी रुपयांची रोकड, २४९.०३८ कोटींची दारू, १२१४.४६ कोटींचे अमली पदार्थ, ९७२..२५३ कोटींचे सोने आणि धातू तसेच ५३.१६७ कोटींच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -