Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मंदिरात RSSच्या शाखांचं आयोजन होणार नाही, केरळच्या त्रावणकोर देवास्वम बोर्डाकडून परिपत्रक जारी

मंदिरात RSSच्या शाखांचं आयोजन होणार नाही, केरळच्या त्रावणकोर देवास्वम बोर्डाकडून परिपत्रक जारी

Subscribe

केरळमध्ये मंदिरं चालवणाऱ्या त्रावणकोर देवास्वम बोर्डाने RSSच्या शाखांच्या आयोजनाबाबत १८ मे रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार यापुढे RSS शाखांचं आयोजन सर्व मंदिरांमध्ये केली जाणार नाहीयेत. परंतु जर असं करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर त्या मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं परिपत्रकात म्हटलं आहे.

२०१६ मध्ये त्रावणकोर देवास्वम बोर्डाने एक परिपत्रक जारी करत, मंदिर परिसरात असणाऱ्या आरएसएसच्या शस्त्र प्रशिक्षणावरही बंदी घातली होती. त्यानंतर ३० मार्च २०२१ रोजी पुन्हा परिपत्रक जारी करत आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच या परिपत्रकात धार्मिक विधी आणि उत्सव वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी मंदिर परिसराचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्रावणकोर देवास्वम बोर्ड केरळमधील जवळपास १२४८ मंदिरांची व्यवस्थापन करते.

- Advertisement -

विरोधकांनीही दिला पाठिंबा

काँग्रेस नेते वीडी सतीशन यांनी त्रावणकोर देवास्वम बोर्डाच्या आदेशाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, मी सुद्धा परिपत्रकाचे समर्थन करतो. २०२१मध्येही असे परिपत्रक जारी करण्यात आले होते. परंतु आरएसएसने त्याचे उल्लंघन केले. आरएसएस लोकांमध्ये द्वेष वाढवत आहे, ते लोकांमध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसर अशा कामांसाठी वापरू नये, ते अत्यंत पवित्र स्थान आहे. मी पण परिपत्रकाचे समर्थन करतो.


- Advertisement -

हेही वाचा : मनीष सिसोदिया यांच्याशी गैरवर्तन! आप आक्रमक तर, पोलीस भूमिकेवर


 

- Advertisment -