घरदेश-विदेशसरसंघचालक मोहन भागवतांचा उल्लेख 'राष्ट्र ऋषी'; इमाम उमर इलियासी यांच्याकडून प्रशंसा

सरसंघचालक मोहन भागवतांचा उल्लेख ‘राष्ट्र ऋषी’; इमाम उमर इलियासी यांच्याकडून प्रशंसा

Subscribe

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज एका मशिदीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी तसेच शोएब इलियासी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या भेटीनंतर उमर अहमद इलियासी यांनी मोहन भागवत यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्र ऋषी’ असा केला.

- Advertisement -

डॉ. जमील इलियासी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरसंघचालक भागवत यांनी मौलाना जमील इल्यासी यांच्या मजारीचे दर्शन घेतले. या मजारीवर डोकं टेकवून त्यांनी फूल अर्पण केले. यावेळी इमाम उमर इलियासी आणि शोएब इलियासीसुद्धा उपस्थित होते. जवळपास एक तास मोहन भागवत या मशिदीमध्ये होते. त्यानंतर उमर अहमद इलियासी म्हणाले की, मोहन भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी आहेत. त्यांच्या या भेटीमुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल. आम्ही सर्व मानतो की राष्ट्र सर्वोपरी आहे. आमचा डीएनए एक आहे, फक्त परमेश्वराची उपासना करण्याची पद्धत वेगळी आहे.

हेही वाचा काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ वादाच्या भोवऱ्यात, सावरकरांचे पोस्टर गांधीजींच्या फोटोंनी झाकले

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम समाजातील लोकांसोबत संपर्क वाढवला आहे. मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांसोबत भेटी घेतल्या आहेत. गेल्यावर्षीही भागवत यांनी मुस्लिम समाजातील वैचारिक नेत्यांसोबत एका हॉटेलमध्ये चर्चा केली होती. तसंच, सप्टेंबर २०१९ मध्ये मोहन भागवत यांनी दिल्लीच्या आरएसएसच्या कार्यालयात जमीयत उलेमा-ए-हिंद प्रमुख मौलाना सैयद अरशद मदनी यांची भेट घेतली होती.

मुस्लिम-हिंदू समाजात सलोखा निर्माण व्हावा याकरता गेल्या महिन्यात मुस्लिम समाजातील काही लोकांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. २२ ऑगस्ट रोजीही मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजातील काही लोकांची भेट घेतली होती. यावेळी नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच, वाराणसी येथील ज्ञानवापी मंदिरावरून सुरू असलेल्या वादाबाबतही या भेटीत चर्चा झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -