Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी इन्फोसिसकडून नक्षलवादी, देशद्रोह्यांना मदत- आरएसएसचा आरोप

इन्फोसिसकडून नक्षलवादी, देशद्रोह्यांना मदत- आरएसएसचा आरोप

आरएसएस समर्थक पांचजन्य या साप्ताहीकातील लेखात इन्फोसिसने नक्षलवादी, डावे, यांना मदत केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

इन्फोसिस कंपनीकडून देशविरोधी शक्तींना आर्थिक मदत तर मिळत नाही ना असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला  आहे. आरएसएस समर्थक पांचजन्य या साप्ताहीकातील लेखात इन्फोसिसने नक्षलवादी, डावे, यांना मदत केल्याचा उल्लेख करण्यात आला असून यासंदर्भात आमच्याकडे पुरावे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इन्फोसिसने वस्तू व सेवाकर आणि प्राप्तीकरचे पोर्टल तयार केले आहे. मात्र या पोर्टलमध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. याच मुद्द्यावरून आरएसएसने इन्फोसिसवर निशाणा साधला आहे. देशाची अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याची शंकाही पांचजन्य मध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पोर्टलमध्ये सतत होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे करदात्यांचा भारतीय अर्थव्यव्यस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचेही या लेखात म्हटले आहे. त्याचबरोबर याआधीही इन्फोसिसने नक्षलवादी, डावे यांच्याबरोबरच टुकडे टुकडे टोळ्यांना मदत केली होती. असा आरोपही यात करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत सरकारने विश्वासार्हतेच्या आधारावरच इन्फोसिसला महत्त्वाची कामे दिल्याचे म्हटले आहे.

 

- Advertisement -