Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी आता मुस्लिम बहुल भागात संघाच्या शाखा

मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी आता मुस्लिम बहुल भागात संघाच्या शाखा

चिंतन बैठकीत पश्चिम बंगालमधील भाजपची पकज मजबूत करण्यासाठी तीन भागात संघाचे मुख्य कार्यालय तयार करण्यात येणार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपला आलेल्या अपयशावर चर्चा केली आहे. चित्रकुटमध्ये झालेल्या पाच दिवसीय चिंतन बैठकीमध्ये आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भाजपला विजयी करण्यासाठी संघाने कंबर कसली असून तयरी सुरु केली आहे. चिंतन बैठकीत पश्चिम बंगालमधील भाजपची पकज मजबूत करण्यासाठी तीन भागात संघाचे मुख्य कार्यालय तयार करण्यात येणार आहे. तसेच मुस्लीम बहुल भागात शाखा सुरु करण्याचा मोठा निर्णय संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी घेतला आहे. यामध्ये मुस्लीम बांधवांना संघाशी जोडण्यात येणार आहे.

संघाच्या बैठकीत सांगण्यात आले की, अपेक्षेप्रमाणे पश्चिम बंगालच्या निवडणूकीमध्ये भाजपला यश मिळाले नाही यामुळे बंगालमध्ये हिंदुत्त्वाला धार देण्याची गरज आहे. बंगालमधील राजकारण समजून घेऊन पुढील रणनिती आखण्याची गरज आहे. हिंदुच्या मुस्लिम वर्गालाही संघासोबत जोडण्याची गरज आहे. यामुळे सुसंवाद आणि समन्वय चांगला राहिल. तसचे देशातील युवांना संघासोबत जोडण्यावर भर देण्यात येत आहे. बैठकीच्या पहिल्या सत्रात संघाचे प्रमुख डॉ. महोन भागवत यांनी राज्यातील प्रचारकांच्या कामाचा आढावा घेतला आहे.

- Advertisement -

संघाच्या बैठकीत काही राज्यांतील प्रचारकांनी म्हटलं आहे की, काही राज्यातील राज्य सरकारच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. संघाच्या शाखा शहरांतून गावखेड्यांत केल्या पाहिजे. संघाचा विचार गावांतील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजेत यावरही चर्चा करण्यात आली. संघात काही महत्त्वाच्या पदांमध्ये बदल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन भागात प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण बंगालमध्ये प्रांत प्रचारक जलधर महतो यांना सह क्षेत्र प्रचारक जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रांत प्रचारक प्रशांत भट्ट यांना दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक करण्यात आले आहे. पुर्वेकडील ओडीसा आणि बंगालच्या प्रांतातील सह क्षेत्र प्रचारक रामापदो पाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

चित्रकूटमध्ये झालेल्या बैठकीत ४५ प्रांत प्रचारकांनी हजेरी लावली होती. संघाच्या बैठकीत सर्व प्रांत प्रचारकांना एक वर्षाच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली आहे. संघ मजबूत करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी संघाकडून आयटी सेलची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये आईआईटी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. भाजपापेक्षा संघाची आयटी सेल हा वेगळा असणार आहे. संघाकडून सर्व कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रिय होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -