घरदेश-विदेशराम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली

राम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली

Subscribe

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद एकत्र येऊन दिल्लीतील रामलीला मैदानावर ९ डिसेंबर रोजी मेगा रॅली काढणार आहे.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद (विहिंप) एकत्र येऊन दिल्लीतील रामलीला मैदानावर ९ डिसेंबर रोजी मेगा रॅली काढणार आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी ही मोर्चेबांधणी केली जाणार आहे. या रॅलीमध्ये साधारण ८ लाख लोकं सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात साधू-संतही सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. या मेगा रॅलीमध्ये आरएसएसचे सर्व मोठे नेता असणार आहेत. अखिल भारतीय संत समितीच्या वतीने ९ डिसेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावरील मेगा रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते राम मंदिराबाबत कायदा बनवण्यासाठी तसेच अध्यादेश आणण्यासाठीची मागणी करणार आहेत. त्यामुळे देशभरातील साधू-संतांना या रॅलीत सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

वाचा : राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाला हे करावे लागणार

- Advertisement -

अयोध्या, नागपूर, बंगळुरुमध्ये जनाग्रह रॅली

आरएसएसने २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, नागपूर आणि बंगळुरुमध्ये जनाग्रह रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवला जाणार आहे. आरएसएस अशावेळी रॅली काढत आहेत, जेव्हा सुप्रीम कोर्टात बाबरी मस्जिद-राम जन्मभूमी जमिनीबाबतची सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आरएसएसचे अंबरीश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, या रॅलीमध्ये ५ ते १० लाखांपर्यंत लोकं सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. या लोकांकडून राम मंदिर उभारणीबाबतचे मत मागितले जाणार आहे.

वाचा : राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा

- Advertisement -

राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे सांगतानाच राजकारणामुळे राम मंदिराची निर्मिती रखडली असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यापूर्वी म्हटले होते. ते संघाच्या विजयदशमी उत्सवात बोलत होते. राम फक्त हिंदूंचे नाहीत, ते संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. राम मंदिर उभारले गेले तर देशात सद्भावनेचे वातावरण निर्माण होईल, असे सरसंघचालक म्हणाले. केंद्रात सत्ता असली तरी राम मंदिराचे काम का होत नाही, असेही विचारले जाते.

वाचा : मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -