घरदेश-विदेशहर घर तिरंगा! सोशल मीडिया डीपीवर तिरंगा न ठेवल्याने टीका; आरएसएसने दिले...

हर घर तिरंगा! सोशल मीडिया डीपीवर तिरंगा न ठेवल्याने टीका; आरएसएसने दिले उत्तर

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला डीपी बदलला आहे. मात्र या डीपीमध्ये फक्त तिरंगा नाही तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हातात तिरंगा घेतलेला फोटो ठेवला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 2 ऑगस्टपासून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईल फोटोत राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो ठेवण्याचे आवाहन केले. यानंतर अनेकांनी आपल्या प्रोफाईल फोटोवर तिरंगा झेंडा ठेवला. यात काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी देखील पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिरंगी झेंडा ठेवला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगी झेंड्याचा फोटो नसल्याने अनेकांनी आक्षेप नोंदवला. आरएसएस नेहमी भाजपच्या समर्थनार्थ भूमिका घेताना दिसते, मात्र मोदींच्या आवाहनानंतर आरएसएसने प्रोफाईल फोटोवर तिरंगी झेंडा न ठेवल्याने अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. या टीकेला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर दिले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी टीकेला उत्तर देताना म्हटले की, अशा गोष्टींचे राजकारण करणे टाळले पाहिजे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांना आमचा पाठींबा आहे.

- Advertisement -

सुनील आंबेकर म्हणाले की, या प्रकारच्या कार्यक्रमांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. अशा प्रकरणांचे राजकारण करणे चुकीचे आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की, संघावर टीका करणारे, प्रश्न उपस्थित करणारी लोकं, पक्ष देशाच्या फाळणीसाठी जबाबदार आहेत. असा आरोप केला. तसेच जुलैमध्ये सरकारी आणि खासगी संस्थांशी संबंधित संघटनांच्या आयोजित कार्यक्रमांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठींबा देत सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला डीपी बदलला आहे. मात्र या डीपीमध्ये फक्त तिरंगा नाही तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हातात तिरंगा घेतलेला फोटो ठेवला आहे. यासोबत एक मेसेजही लिहिण्यात आला आहे, तो म्हणजे “देशाची शान आहे तिरंगा, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे तिरंगा. यातून त्यांनी मोदींच्या आवाहनाला टोला लगावत पंडित जवाहरलाल नेहरुंचे विचार अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपकडून नेहमीच नेहरुंच्या विचारांवर टीका झाली, त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपकडून सातत्याने निशाणा साधला जातो. यात आता पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला काँग्रेसने प्रतिसाद देत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील पंडित नेहरुंचा हातात तिरंगा घेतलेला फोटो डीपीवर ठेवला आहे. तर काँग्रेसच्या अधिकृत ट्विट हँडलवर देखील हाच फोटो डीपी म्हणून ठेवण्यात आला आहे.


हेही वाचा : पुढील दोन वर्षांत भारतात अमेरिकेसारखे रस्ते बनवू, नितीन गडकरींचे आश्वासन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -