आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर छापा, कोट्यवधीच्या मालमत्तेचं घबाड

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जबलपूर आरटीओ संतोष पाल सिंग यांच्या घरावर छापा टाकला आहे. सिंग यांच्या घरातून उत्पान्नापेक्षा ६५० पट जास्त किमतीची मालमत्ता सापडल्यानंतर तपासात जबलपूरच्या आरटीओकडे १६ लाखांची रोकड आढळून आली आहे.

या छापेमारीवेळी घरातून १६ लाखांच्या रोख रकमेसह काळ्या पैशातून मिळवलेल्या अमाप मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. आर्थिक गुन्हे कक्षाच्या पथकाने काल बुधवारी रात्री बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष पाल यांच्या घरावर छापा टाकला. शताब्दीपुरम कॉलनीतील त्यांच्या आलिशान घरावर ईओडब्लूच्या पथकाने कारवाई केली.

EOW SP देवेंद्र प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आरटीओ अधिकारी संचोष पाल आणि त्यांची लिपीक पत्नी रेखा पाल यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या, ज्याची पडताळणी निरीक्षक स्वर्णजीत सिंह धामी यांनी केली होती. आरटीओ संतोष पाल यांच्या सेवा कालावधीत वैध स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांचा खर्च आणि संपादित मालमत्ता ६५० टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. EOW ला आरटीओच्या पीपी कॉलनी ग्वारीघाट येथील १२४७ चौरस फुटांच्या घराची कागदपत्रे तपासादरम्यान सापडली आहेत.


हेही वाचा : पीएम मोदींच्या मतदारसंघात ध्वजारोहणानंतर घडला धक्कदायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल…