घरताज्या घडामोडीयासिन मलिकनेच केलं होतं अपहरण, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा दावा

यासिन मलिकनेच केलं होतं अपहरण, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा दावा

Subscribe

 १९९० पासून हे प्रकरण सीबीआयकडे असून रूबिया सईद साक्षीदार आहे. दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी यासिन मालिक सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मेहम्मद सईद (Mufti Mohammad Sayeed) यांची मुलगी रूबिया सईद (Rubia Sayeed) हिचं १९८९ साली अपहरण झालं होतं. हे अपहरण जेकेएलएफचे अध्यक्ष यासीन मलिक (Yasik Malik) आणि तिघांनी मिळून केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. रूबिया सईद यांनी आज कोर्टात याबाबत माहिती दिली. (Rubaiya Sayeed identifies yasin malik and 3 others as her abductors)

हेही वाचा – राजपक्षे यांचा राजीनामा, २० जुलैला नवे राष्ट्रपती ठरणार; श्रीलंकेत आतापर्यंत काय काय घडलं पाहा!

- Advertisement -

रूबिया सईदच्या या अपहरण प्रकरणामुळे देशात खळबळ माजली होती. तिला सोडण्याकरता भारताला ५ कुख्यात दहशवाद्यांना सोडावं लागलं होतं. १९९० पासून हे प्रकरण सीबीआयकडे असून रूबिया सईद साक्षीदार आहे. दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी यासिन मालिक सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

हेही वाचा – मालकिणीची हत्या केल्यानंतर पिटबुल 14 दिवस ताब्यात

- Advertisement -

९०च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी स्तोम माजवले होते. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रूबिया सईद यांचं अपहरण करण्यात आलं होतं. मुफ्ती मोहम्मद सईद त्यावेळी मोठे नेते होते त्यानंतर ते मुख्यमंत्रीही बनले. मात्र, १९८९ मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलीच्या अपहरणाच्या बातमीने संपूर्ण देशात खळबळ माजवली होती. रूबिया सईद यांना सोडवण्यासाठी सरकारने त्यावेळी खूप प्रयत्न केले. त्यांना सोडवण्यासाठी सरकारला ५ दहशतवाद्यांना सोडावं लागलं. याप्रकरणाचा मास्टरमाईंड जेकेएलएफचा यासीन मालिक होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -