Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत RuPay Prepaid Forex cards : परदेशात वापरता येणार, शॉपिंग करता येणार; RBI...

RuPay Prepaid Forex cards : परदेशात वापरता येणार, शॉपिंग करता येणार; RBI ची भेट

Subscribe

 

नवी दिल्लीः रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया RBI ने बॅंकांना RuPay Prepaid Forex cards देण्यास परवानगी दिली आहे. हे कार्ड परदेशात वापरता येणार आहे. परदेशात शिकणारे व व्यापार करणाऱ्यांसाठी हे कार्ड फायदेशीर ठरणार आहे. या कार्डद्वारे परदेशात व्यवहार करता येणार आहे, शॉपिंग करता येणार आहे. RBI ने नागरिकांना ही चांगली भेट दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचाः ₹ 2000 Note : आतापर्यंत बँकांकडे किती नोटा जमा झाल्या? आरबीआय गव्हर्नरने दिली माहिती…

रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णयही  RBI चे प्रमुख शक्तिकांत दास यांनी जाहिर केला. RBI च्या बैठकीत बॅंकांना RuPay Prepaid Forex cards देण्यास परवानगी देण्यात आली आहे. परदेशात RuPay डेबिट, क्रेडिट आणि आता प्री-पेड कार्ड वापरता येणार आहे. या कार्डद्वारे परदेशात व्यवहार करता येणार आहेत. परदेशात शिकणारे विद्यार्थी आणि व्यापारी यांना या कार्डचा फायदा होऊ शकतो. शॉपिंग आणि इतर खर्चही या कार्डद्वारे करणे शक्य आहे.

- Advertisement -

RBI च्या निर्णयामुळे RuPay कार्डला जागतिक ओळख मिळणार आहे. भूटान, सिंगापूर, नेपाळसह अन्य काही देशांनी RuPay कार्डला परवानगी दिली आहे. इतर काही देशांमध्येही RuPay कार्डला परवानगी देण्याबाबत चर्चा सुरु आहे.

तसेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज 6.5 टक्केच राहील, असा अंदाज RBI ने व्यक्त केला आहे. एप्रिलमध्येच RBI ने  2023-24 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.5 टक्के केला होता. चालू आर्थिक वर्षात देशाची जीडीपीची वाढ 6.5 टक्के राहील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच दास यांनी तिमाहीनिहाय जीडीपीचा वृद्धीदर कसा राहील हेही सांगितले. दास म्हणाले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 8 टक्क्यांपर्यंत असू शकतो. दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के राहील, असा अंदाज आहे.

देशांतर्गत मागणीची परिस्थिती वाढीला पोषक आहे आणि ग्रामीण भागातील मागणी देखील पुनरुत्थानाच्या स्थितीत आहे, असे सांगून शक्तिकांत दास म्हणाले की, 2023च्या दुसऱ्या तिमाहीत, जागतिक अर्थव्यवस्थने मागील तिमाहीत गाठलेली उच्च गती कायम ठेवली आहे. मध्यम चलनवाढ, कठीण आर्थिक परिस्थिती, बँकिंग क्षेत्रातील दबाव आणि दीर्घकाळापर्यंत भू-राजकीय संघर्ष यासारखे घटक असतानाही हे चित्र दिसत असल्याचे दास यांनी सांगितले.

रेपो दर ‘जैसे थे’; सर्वसामान्यांना दिलासा

6 ते 8 जूनपर्यंत चाललेल्या RBI च्या पतधोरण समितीने (MPC) रेपो दरात तूर्तास कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 6.5 टक्केच राहणार आहे.RBI च्या या निर्णयामुळे वाहन, घर आणि इतर कर्जांवरील व्याजदरात आणखी वाढ होणार नाही. रेपोदर न वाढवण्याचा आरबीायचा निर्णय मार्केटला अपेक्षितच होता. रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर व्यापारी बँका त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात.

- Advertisment -