घरदेश-विदेशअमेरिकन डॉलर समोर रुपयाची विक्रमी घसरण, 'या' वस्तू होणार महाग

अमेरिकन डॉलर समोर रुपयाची विक्रमी घसरण, ‘या’ वस्तू होणार महाग

Subscribe

नवी दिल्ली – सोमवारी अमेरिकन डॉलर समोर रुपया विक्रमी पातळीवर घसरला. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 56 पैशांनी घसरून 81.54 च्या पातळीवर उघडला. रुपयाची ही आतापर्यंतची नीचांकी पातळी असून डॉलरने 20 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. मात्र, नंतर त्यात थोडी वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्याने कच्चे तेल आणि इतर वस्तूंची आयात महाग होणार आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रेपो दरात वाढ होण्याची अपेक्षा – 

- Advertisement -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आधीच महागाई रोखण्यासाठी 30 सप्टेंबरला रेपो दर वाढवण्याची अपेक्षा आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केल्याने भारतीय रुपयावर दबाव आला आहे. वाढती व्यापार तूट आणि परकीय भांडवलाचा प्रवाह यामुळे महागाई वाढण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक या आठवड्यात होणार आहे.

सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम? –

- Advertisement -

डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर गेल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम आयात वस्तूंवर होणार आहे. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. देशात 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणजेच भारताला कच्च्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल आणि परकीय चलन जास्त खर्च होईल.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन –

01 जानेवारी 75.43
01फेब्रुवारी ७४.39
01मार्च 74.96
01एप्रिल 76.21
01मे 76.09
01जून 77.२१
01जुलै 77.95
01ऑगस्ट 79.54
29 ऑगस्ट 80.10
22 सप्टेंबर 80.79
26 सप्टेंबर 81.54

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -