घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युक्रेनसह रशियाचे 'हे' ३१ शत्रू देश, पाहा यादी

Russia-Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युक्रेनसह रशियाचे ‘हे’ ३१ शत्रू देश, पाहा यादी

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. यादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या शत्रू देशांच्या यादीला मंजूरी दिली आहे. या यादीमध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, कॅनडा, नॉर्वे, सिंगापूर, उत्तर कोरिया, स्वित्झर्लंड आणि युक्रेनसह ३१ देश सामील आहेत. चीनच्या सरकारी मीडियाने याबाबतचा दावा केला आहे.

चीनी सरकारी मीडिया सीजीटीएनने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मंजूरी दिली आहे. या यादीमध्ये अमेरिका, ब्रिटन, युक्रेन, जापान आणि युरोपियन यूनियनचे सदस्य देशांची नावे आहेत. युरोपियन यूनियनमध्ये २७ देश आहेत. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या निशाण्यावर आहे. अमेरिका आणि पश्चिम देशांनी अर्थव्यवस्थेला धक्का देण्याच्या हेतूने रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत.

- Advertisement -

यामुळे रशियाच्या शत्रू देशांच्या यादीत या देशांची नावे

अमेरिका

अमेरिकेने रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांचा प्रवेश रोखला आहे. याशिवाय रशियाच्या 4 बँक आणि सरकारी ऊर्जा कंपनी जगप्रोवर निर्बंध लावले आहेत. तसेच अमेरिकेने रशियन विमानांसाठी आपले हवाई हद्द बंद केली आहे. यासोबत अमेरिकेने युक्रेनला हत्यारे पाठवली असून आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

ब्रिटन

ब्रिटनने रशियाची सरकारी विमान कंपनी एयरोलोफ्टसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. तसेच ब्रिटनने रशियाच्या ५ बँकांवर निर्बंध लावले आहेत. शिवाय पुतिन यांची संपत्ती जप्त करणे आणि त्याचे अकाऊंट खंडित करण्याबाबत बोलले आहेत. एवढेच नाही तर रशियाच्या अब्जाधिशांच्या खासगी विमानांसाठी ब्रिटनने हवाई हद्द बंदी केली आहे. अमेरिकेप्रमाणे ब्रिटनने युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे.

युक्रेन

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे, हे आपल्याला सर्वांच माहित आहे. राष्ट्रपती पुतिन यांनी युक्रेनला वेगळा देश मानत नसल्याचे म्हटले होते. या युद्धामध्ये रशियाने आपल्या ५०० सैनिकांना गमावले आहेत.

जपान

रशियाविरोधात लढण्यासाठी जपानने युक्रेनला हत्यारांची मदत केली आहे. जपानने युक्रेनला बुलेटप्रूफ जॅकेट, हॅलमॅटसह अनेक संरक्षण उपकरणे पाठवली आहेत. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो सांगितले की, ते युक्रेनला बुलेटप्रूफ जॅकेट, हॅलमेट, टेंट, जनरेटर, फूड पॅकेट्स, विंटर क्लॉथ आणि औषधं पाठवत आहेत.

युरोपियन यूनियन

इतर देशांप्रमाणे युरोपियन यूनियनने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. युरोपियन यूनियनमध्ये 27 देश आहेत. युरोपियन यूनियनच्या सर्व सदस्यांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केले आहे. याशिवाय युरोपियन यूनियनमधील असलेल्या अब्जाधिशांची संपत्ती जप्त केली जात आहे. एवढेच नाही तर युरोपियन यूनियनमधील सर्व देशांनी युक्रेनला फक्त आर्थिक बळ दिले नसून लष्करी बळ देखील देत आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War: झेलेंस्की यांच्यानंतर पंतप्रधान मोदींची 50 मिनिटे पुतिन यांच्यासोबत बातचीत; युक्रेनच्या परिस्थितीवर चर्चा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -