घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचा पलटवार; ३६ देशांसाठी हवाई हद्द...

Russia Ukraine War: युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचा पलटवार; ३६ देशांसाठी हवाई हद्द केली बंद

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. यादरम्यान युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाने पलटवार केला आहे. रशियाने ब्रिटन आणि जर्मनीसह ३६ देशांच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे, अशी माहिती एएफपीने दिली आहे. युक्रेनवर हल्ल्या केल्यामुळे या देशाने विविध प्रकारचे निर्बंध रशियावर लावले होते. युरोपीय संघाने रशियच्या एअरलाईन्ससाठी आपले हवाई हद्द बंद करण्यावर सहमती दर्शवली आहे. यामुळे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांना आपला जिनेव्हा दौरा रद्द करावा लागला आहे. लावरोवा यूएनच्या बैठकीसाठी सामिल होण्यासाठी जात होते.

- Advertisement -

कोणत्या ३६ देशांसाठी हवाई हद्द बंद? 

३६ देशांमध्ये अल्बानिया, अँगुइला, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, ब्रिटिश व्हर्जिन लँड्स, जर्मनी, जिब्राल्टर, हंगेरी, ग्रीस, डेन्मार्क, कॅनडा, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्सी, आयर्लंड, आइसलँड, इटली, लॅटव्हिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि युनायटेड किंगडम या देशांचा समावेश आहे.

युरोपिय संघाने हत्यारे युक्रेनमध्ये पाठवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत आणि शिवाय क्रेमलिन समर्थक माध्यम संस्थांना निशाणा बनवले आहे. तर अमेरिकन अर्थ विभागाने आज म्हटले की, रशियाच्या केंद्रीय बँक आणि सरकार गुंतवणूक निधीवर नवे निर्बंध लावले आहेत.

- Advertisement -

दरम्यान एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटले की, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपान, युरोपीय संघ आणि इतर देशांनी अमेरिकेसोबत मिळून निर्बंधांच्या माध्यमातून रशियाच्या केंद्रीय बँकला निशाणा बनवले आहे. अर्थ विभागानुसार, या निर्णयामुळे रशियन केंद्रीय बँक अमेरिका किंवा अमेरिकन संस्थेकडून निधी उभा करू शकत नाही.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान आज दोन्ही देशांमध्ये बेलारुसमध्ये बैठक झाली. या बैठकीत युक्रेनने रशियाकडे तात्काळ युद्ध थांबवण्याची आणि सैन्य परत घेण्याची मागणी केली. संयुक्त राष्ट्र म्हणाले की, ‘युद्धामुळे पाच लाखांहून अधिक लोक युक्रेन सोडून गेले आहे. तसेच रशियाच्या हल्ल्यात १०२ सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.’


हेही वाचा – Russia-Ukraine War: अमेरिका युक्रेनमध्ये का नाही पाठवत सैन्य? पुतीन यांना घाबरतायत का बायडेन?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -