घरताज्या घडामोडीRussia-Ukraine Conflict: युक्रेनवर कब्जा करणार नाही, UNच्या बैठकीत रशियाचा दावा

Russia-Ukraine Conflict: युक्रेनवर कब्जा करणार नाही, UNच्या बैठकीत रशियाचा दावा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. युक्रेनमधील असलेल्या परिस्थितीवर सतत चर्चा होत आहे. युक्रेनवर संयुक्त राष्ट्र महासभेचे ११ वे आपत्कालीन विशेष सत्र सुरू होते. परंतु रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांची बैठक संपली असून युक्रेनवर कब्जा करणार नाही, अशा प्रकारचा दावा UNच्या बैठकीत रशियाने केला आहे.

संयुक्त राष्ट्रांची बैठक मागील ६ तासांपासून सुरू होती. युक्रेन आणि जॉर्जिया नाटोमध्ये सामील होण्यासाठी कृती आराखडा तयार करत असल्याचे संयुक्त राष्ट्रातील रशियन राजदूताने सांगितले.

- Advertisement -

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश प्रचारानंतर रविवारी रात्री महत्त्वाची बैठक केली होती. या बैठकीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्राधान्याने पाऊल उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा एका उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या सीमावर्ती देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आला.

पंतप्रधान मोदींनी आज Slovak Republicचे पंतप्रधान एडवर्ड हेगर यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी Slovak Republicने मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी पुढील काही दिवस Slovak Republicला मदतीची विनंती केली आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आणि इतर लोकांना मिळून जवळपास २० हजारांहून अधिक भारतीय युक्रेनमध्ये राहतात. सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे.


हेही वाचा : K CSR आणि प्रशांत किशोर यांच्यातील बैठकीने राजकीय चर्चांना उधाण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -