घरदेश-विदेशUkraine Russia War : युक्रेन युद्धभूमीत आता रशियन 'स्पाय डॉल्फिन'ची एन्ट्री; पाण्याखालील...

Ukraine Russia War : युक्रेन युद्धभूमीत आता रशियन ‘स्पाय डॉल्फिन’ची एन्ट्री; पाण्याखालील हल्ले रोखण्यास होणार मदत

Subscribe

त्याचबरोबर ज्या बंदरातून ही सॅटेलाइट इमेज समोर आली आहे त्या बंदराचे नाव सेवास्तोपोल बंदर आहे. हे बंदर रशियन सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते क्रिमियाच्या दक्षिणेस आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. या दोन महिन्यांत रशियाने युक्रेनमधील अनेक मोठी शहरं उद्धस्त केली. यामुळे लाखो युक्रेन नागरिकांना देश सोडून शेजारील देशांत स्थलांतर करावे लागले. अशा परिस्थितीतही रशियाकडून सातत्याने घातक बॉम्ब हल्ले सुरु आहे. आता या युद्धभूमीत रशियाने डॉल्फिन माशांना सोडल्याची माहिती सॅटेलाइट इमेजमधून समोर आली आहे.

रशियाने काळ्या समुद्रातील नौदल लष्करी तळांवर ट्रेंड मिलिटरी डॉल्फिन तैनात केले आहेत. या डॉल्फिनचा फोटो समोर येताच, रशिया नौदलाच्या ताफ्यावर पाण्याखालून होणारे हल्ले रोखण्यासाठी या डॉल्फिनचा वापर करत असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.

- Advertisement -

यूएस नेव्हल इन्स्टिट्यूटने (USNI) या डॉल्फिनच्या सॅटेलाइट इमेजचे परीक्षण केले. रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केला तेव्हा दोन डॉल्फिन लष्करी तळावर नेण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. रशियाच्या लष्करी कामासाठी या डॉल्फिनला प्रशिक्षण देण्यात आल्याचे म्हटले. रशियाचे हे स्पाय डॉल्फिन समुद्राखालील गोष्टी शोधण्यासाठी आणि शत्रूच्या तळांचा आणि हालचालींचा शोधण्यासाठी वापरले जात आहेत.

त्याचबरोबर ज्या बंदरातून ही सॅटेलाइट इमेज समोर आली आहे त्या बंदराचे नाव सेवास्तोपोल बंदर आहे. हे बंदर रशियन सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते क्रिमियाच्या दक्षिणेस आहे. USNI च्या म्हणण्यानुसार, अनेक रशियन सैन्य आपली जहाजे याठिकाणी थांबवतात. रशियन सैन्याने येथे तळ ठोकण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे बंदर शत्रूच्या क्षेपणास्त्रांच्या कक्षेबाहेर आहे. तसेच त्यांच्यावर पाण्याखाली हल्ला होण्याचा धोका नेहमीच असतो. त्यामुळेच रशियाने सेव्हस्तोपोलजवळील एका मत्स्यालयात डॉल्फिनला प्रशिक्षित केले आहे, जेणेकरून पाण्याखालून होणाऱ्या हल्ल्यांपासून सावध राहता येईल.


Electric scooter fire : इलेक्ट्रिक स्कूटर आग घटना रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नव्या लाँचिंगवर बंदी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -