India-Russia talks: तेल होणार स्वस्त, युद्धादरम्यान रशियाने भारताला दिली स्पेशल ऑफर

russia gives special offer to india offers huge discount on oil prices
India-Russia talks: तेलाच्या किंमती होणार स्वस्त, युद्धादरम्यान रशियाने भारताला दिली स्पेशल ऑफर

भारतातील तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी रशियाने आता एक स्पेशल ऑफर दिली आहे. जेणेकरून भारतातील तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ल्याच्या अगोदरच्या किंमतीवर ३५ डॉलर प्रति बॅरल सूट देण्याची भारताचा ऑफर देण्यात आली आहे. अलीकडचे दिल्लीत आलेल्या रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गैई लावरोव (Sergei Lavrov) यांनी ही ऑफर जारी केली.

रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे केले कौतुक

WIONच्या वृत्तानुसार, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव गुरुवारी रात्री उशीरा चीनहून दिल्लीत पोहोचले. लावरोव भारताच्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत एका बैठकीदरम्यान आपल्या सुरुवातीच्या चर्चेत म्हटले की, ‘भारत फक्त एकतर्फीच नाही तर वस्तुस्थितीनुसार ही भूमिका घेत आहे, याचे आम्ही कौतुक करतो.’

युक्रेनकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यामुळे या महिन्यात भारताने रशियाकडून सुर्यफूल तेलासंबंधित मोठा सौदा केला आहे. रशियाच्या मेसेजिंग सिस्टम एसपीएफएसचा (SPFS) वापरामुळे भारत रुपये आणि रुबलद्वारे (रशियन चलन) पैशाचा व्यवहार करू शकते. दरम्यान अद्याप भारत सरकारने या प्रस्तावावर कोणताही फैसला केला नाही.

रशियाचे हे सिस्टम काय?

माहितीनुसार, या प्रस्तावाअंतर्गत रशियन चलन रुबल भारतीय बँकेत जमा केले जाईल आणि याद्वारे भारतीय चलन रुपयात बदल केले जाईल. अशाच प्रकारे रुपयाला रुबलमध्ये बदलून व्यवहार केला जाईल. याशिवाय रशियाला भारतीय आणि रशियन बँकांकडून जारी कार्ड एमआयआर पेमेंट सिस्टमशी जोडायचे आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्जिकल स्ट्राईक ; दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच केलं मोठं धाडस