घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाकडून हायपरसॉनिक हल्ला, हे क्षेपणास्त्र किती धोकादायक ?,...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाकडून हायपरसॉनिक हल्ला, हे क्षेपणास्त्र किती धोकादायक ?, भारताकडे आहे का क्षमता?

Subscribe

मागील २४ दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात महायुद्ध सुरू आहे. काल शनिवारी रशियन सैन्याने युक्रेनवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. रशियन संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, काल रशियाने हायपरसॉनिक एरोबॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह युक्रेनियन क्षेपणास्त्रं आणि किंजल एव्हिएशन मिसाईल सिस्टममधील विमानांसाठी दारुगोळा असलेले एक मोठे गोदाम नष्ट केले आहे.

रशिया-युक्रेन युद्धात हायपरसॉनिक शस्त्रे वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेषत: हे क्षेपणास्त्र अमेरिका आणि चीनमध्ये चर्चेत राहिले आहे. हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे काय? हे क्षेपणास्त्र धोकादायक का आहे? जगातील कोणत्या देशांकडे हे शस्त्र आहे? भारताकडे ही क्षमता आहे का? असं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

काय आहे हायपरसॉनिक मिसाइल ?

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर सुपर विनाशकारी शस्त्र म्हणून केला जातो. हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या पाचपट वेगाने उड्डाण करताना त्यांच्या निशाण्याकडे जाणारी क्षेपणास्त्रे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे गेल्या तीन दशकांनंतरचे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील हायपरसॉनिक वेगाने धावते. हे क्षेपणास्त्र एका ठिकाणाहून सोडले की ते कोणत्या ठिकाणी पडेल, हे देखील समजते. अशा परिस्थितीत या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे सोपे आहे. याशिवाय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर या क्षेपणास्त्रांची दिशा बदलता येत नाही. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची दिशा बदलणे शक्य आहे.

- Advertisement -

भारताकडे हायपरसॉनिक शस्त्र तंत्रज्ञान ?

भारत हायपरसॉनिक शस्त्रांच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. भारताने यापूर्वी त्याची चाचणी घेतली आहे. DRDO ने २०२० मध्ये मानवरहित स्क्रॅमजेटच्या हायपरसॉनिक स्पीड फ्लाइटची यशस्वी चाचणी केली. भारतात हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV)ची चाचणी २० सेकंदांपेक्षा कमी वेळात घेण्यात आली. त्याचा वेग ताशी ७५०० किमी होता. परंतु भविष्यात तो वाढवला किंवा कमीही केला जाऊ शकतो. भारत आपल्या सुरक्षा आणि एका वेगळ्या रणनीतीसाठी हे क्षेपणास्त्र विकसित करत आहे.


हेही वाचा : …तर जम्मू-काश्मीरमध्ये CRPF ची गरज लागणार नाही, केंद्रीय गृहमंत्री शहांचं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -