घरदेश-विदेशचीनप्रमाणेच ४२ वर्षांपूर्वी रशियाच्या लॅबमधून झाला होता व्हायरसचा फैलाव

चीनप्रमाणेच ४२ वर्षांपूर्वी रशियाच्या लॅबमधून झाला होता व्हायरसचा फैलाव

Subscribe

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियामध्ये ४२ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७९ साली एप्रिल आणि मे महिन्यात अचानक न्यूमोनियाची विचित्र लक्षणे आढळलेली रुग्ण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले. काही दिवसात, या अज्ञात आजाराने कमीतकमी ६६ लोकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर पोलिसांनी रुग्णांच्या नोंदी केल्या आणि डॉक्टरांना यासंदर्भात काहीही न बोलण्याची सूचना केली. त्यानंतर अमेरिकन हेरांना रशियातील लॅबमधून कोणता तरी विषाणू पसरल्याची माहिती मिळाली. परंतु रशियाच्या स्थानिक प्रशासनाने एक अजबच युक्तिवाद केला, हा रोग संक्रमित मांसाद्वारे पसरतो. जर ही माहिती ओळखीची वाटत असेल तर या घटना साम्यवादी देश सोव्हिएत युनियन (रशिया) मध्ये घडल्या. आणि आता कोविड -१९ च्या संदर्भात चीनमधून ही परिस्थिती सुरू झाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोव्हिएत युनियनमध्ये हवेत पसरलेला हा प्राणघातक अँथ्रॅक्स संसर्ग तेथील सैन्य लॅबमधून बाहेर पडला. त्यावेळीही अमेरिकन शास्त्रज्ञांनी सोव्हिएत युनियनच्या दाव्यावर आत्मविश्वास व्यक्त केला होता की, संसर्ग पसरविणारे जीवाणू प्राण्यांपासून आता मनुष्यांपर्यंत आले. १९९० मध्ये सखोल तपासणीचा परिणाम समोर आल्यानंतर रशियाच्या येकाटरिंगबर्ग शहरातील लॅबमधून हा संसर्ग फैलाव झाल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या काळातील पिडीतांची ओळख लपवण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे वेगळे-वेगळे भाग करून पुरण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यांवरील नावाची पट्टी काढून टाकण्यात आली आहे. त्यांचे मृतदेह शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांसह पुरण्यात आले होते.

- Advertisement -

जैविक शस्त्रे तज्ज्ञ मेसलसन यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, १९९२ मध्ये सोव्हिएत संघ विघटनानंतर ते आणि त्यांची पत्नी वैद्यकीय मानववंशशास्त्रज्ञ जेनी गुलियन हे येकाटरिंगबर्ग शहरात दाखल झाले आणि इतर अमेरिकन तज्ञांसमवेत या घटनेचा सखोल अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी असे गृहित धरले की २ एप्रिल, १९७९ रोजी ईशान्य वाऱ्यामुळे काही मिलीग्राम अँथ्रॅक्स पसरला आणि कारखान्याच्या बाहेर किमान ३० मैलांच्या अंतरावर वाऱ्यामुळे हा संसर्ग पसरला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -