घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: रशियाची 'ही' ऑफर भारताने स्वीकारली तर मिळून शकते स्वस्त...

Russia Ukraine War: रशियाची ‘ही’ ऑफर भारताने स्वीकारली तर मिळून शकते स्वस्त तेल

Subscribe

युक्रेनसोबतच्या युद्धामुळे निर्बंधांना सामान करत असलेल्या रशियाने भारताला आयत वस्तूंच्या व्यवहारासंबंधित एक ऑफर दिली आहे. भारत सरकार सध्या रशियाच्या या प्रस्तावावर विचार करत आहे. डॉलरमधील व्यवहार बंद झाल्यामुळे रशियाच्या केंद्रीय बँकने पेमेंटची एक सिस्टम विकसित केली आहे. प्रामुख्याने भारत रशियाकडून कच्चे तेल आणि शस्त्रे आयात करते. याशिवाय युक्रेनकडून होणाऱ्या पुरवठा खंडित झाल्यामुळे या महिन्यात भारताने रशियाकडून सुर्यफूल तेलासंबंधित मोठा सौदा केला आहे.

माहितीनुसार, रशियाच्या मेसेजिंग सिस्टम एसपीएफएसचा (SPFS) वापरामुळे भारत रुपये आणि रुबलद्वारे (रशियन चलन) पैशाचा व्यवहार करू शकते. दरम्यान अद्याप भारत सरकारने या प्रस्तावावर कोणताही फैसला केला नाही. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव (Sergei Lavrov) गुरुवारी दोन दिवशीय भारत दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान या प्रस्तावावर विचार होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. यानंतर भारताला कमी किंमतीत रशियाकडून कच्चे तेल मिळण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर भारतासाठी हा निर्णय मोठा दिलासादायक ठरेल.

- Advertisement -

असे काम करेल रशियाचे हे सिस्टम

माहितीनुसार, या प्रस्तावाअंतर्गत रशियन चलन रुबल भारतीय बँकेत जमा केले जाईल आणि याद्वारे भारतीय चलन रुपयात बदल केले जाईल. अशाच प्रकारे रुपयाला रुबलमध्ये बदलून व्यवहार केला जाईल. याशिवाय रशियाला भारतीय आणि रशियन बँकांकडून जारी कार्ड एमआयआर पेमेंट सिस्टमशी जोडायचे आहे.

रशियन अधिकारी येणार भारतात

या प्रस्तावावर रशियाच्या केंद्रीय बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा होईल. यासाठी रशियन केंद्रीय बँकचे अधिकारी पुढील आठवड्यात भारतात येऊ शकतात. रशियन शस्त्रांवर भारतीय लष्कराचे अवलंबून राहणे आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय किमती यामुळे भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्यास उत्सुक आहे. रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही स्वस्त तेलाच्या आशेमुळे भारताला द्विपक्षीय व्यापार सुरू ठेवायचा आहे. तसेच चीनच्या लष्करी आक्रमकतेमुळे भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रांची खरेदी सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांना सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पीएम मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान, भाजपच्या महिला खासदारांनी भगवान श्रीकृष्णाशी केली मोदींची तुलना


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -