Meta ला रशियाने दहशतवादी संघटना म्हणून केले घोषित; पण कारण काय?

russia on meta declared a terrorist organization big action by vladimir putin

अमेरिकेतील जगप्रसिद्ध टेक कंपनी मेटा (Meta) विरोधात रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. रशियन सरकारने मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटाला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे. मेटा ही इन्स्टाग्राम (Instagram) फेसबुक (Facebook) ची मूळ कंपनी आहे. रशियातील मॉस्को न्यायालयाने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरेकी क्रियाकलापांचा आरोप करत हे प्लॅटफॉर्म रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कंटेट पोस्ट करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे. रशियाने गेल्या वर्षी मार्चमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी घातली होती.

रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेवर हल्ला केला होता. तेव्हापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रशियाविरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचा आरोप रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. यात इन्स्टाग्राम विशेषतः रशियामध्ये लोकप्रिय आहे. ऑनलाईन जाहिराती आणि सेल्ससाठी हे महत्वाचे प्लॅटफॉर्म मानले जाते. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कंटेट पोस्ट केल्याचे आरोप केला जात आहे. यावेळी मेटाच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, तसेच मेटाने आपण कधीही दहशतवादी कारवायांमध्ये सामील नसल्याचे न्यायालयात सांगितले आहे.

युक्रेनच्या पॉवर स्टेशनवर हल्ले सुरु केल्याच्या एक दिवसानंतर रशियाने हे पाऊल उचलले आहे. यात रशियाने क्रिमियाचा पूल उडवल्यानंतर युक्रेनवर मोठ्याप्रमाणात बॉम्बहल्ले सुरु केले आहेत. 24 फेब्रुवारीला युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर रशिया सोशल मीडियावर करडी नजर ठेवत आहे. यानंतर युरोपमधील टेक कंपन्यांनी रशियन मीडिया बंद केला आहे.

सोमवारीच रशियाकडून अनेक दिवसांनंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये क्षेपणास्त्रे डागण्यात आली. रशियाकडून झालेल्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, रशिया आपल्याला संपवण्याचा कट रचत आहे.


भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार…; शिंदे गटाच्या चिन्हावर दानवेंची टीका