गूड न्युज! दोन दिवसांत मिळेल जगातील पहिली कोरोनाची लस!

अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशांनी रशियाच्या कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित केले.

First batch of Russia COVID-19 vaccine to be released in 2 weeks; mass production starts

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावादरम्यान लोक कोरोनाच्या लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सध्या जगभरात २१ पेक्षा जास्त लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. लस विकसित करण्यात रशिया आघाडीवर असल्याचे दिसत आहे. अहवालानुसार, पहिल्यांदाच रशिया दोन दिवसानंतर म्हणजे १२ ऑगस्ट रोजी कोरोनाची लस नोंदवेल. रशियन आधिकारी आणि तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, ‘जगातील ही पहिला कोरोनाची लस असेल.’

रशियामध्ये कोरोना लस विकसित करण्याचे काम गॅमलेई रिसर्च इंस्टीट्यूट करत आहे. ही इंस्टिट्यूट रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या मते, ‘जर मानवी चाचण्यांचा अंतिम टप्पा यशस्वी झाला तर ऑक्टोबरपर्यंत देशातील लोकांना कोरोनाची लस देण्याचे काम सुरू केले जाईल.’

स्पॅटनिक न्यूजनुसार, गॅमलेई नॅशनल रिसर्च सेंटरचे संचालक अलेक्झांडर गिंटझबर्ग म्हणाले की, ‘एडेनो विषाणूच्या आधारे तयर केली गेली आहे. लस एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य संभाव्य हानी पोहोचवू शकते, अशी कोणतीही चिंता नाही आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, ‘ट्रायल दरम्यान दिसले आहे की, लस दिल्यानंतर लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे हे सिद्ध होते की, ही लस बरोबर दिशेने काम करत आहे.’ तसेच अलेक्झांडर गिंट्सबर्ग म्हणाले की, ‘काही लोकांना लसी दिल्यानंतर थोडा ताप येतो. लसीमुळे या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीस सामर्थ्य मिळते आणि त्याचे दुष्परिणामामुळे ताप येतो. परंतु पॅरासिटामोल घेऊन तो सहज दूर होतो.’

अहवालात म्हटले आहे की, गॅमलेई इंस्टिट्यूटचे प्रमुख प्रोफेसर अलेक्झांडर गिंट्सबर्ग आणि इतर संशोधकांनीही स्वतःला लस देण्याचा प्रयत्न केला होता. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी या पूर्वी सांगितले होते की, ‘कोरोना विषाणूशी लढत असलेले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात पहिल्यांदा कोरोना लस दिली जाऊ शकते.’ तथापि, अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशांनी रशियाच्या कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. कारण रशियाने ट्रायलचा साइंटिफिक डेटा जाहीर न केल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


हेही वाचा – Corona Update: देशात कोरोनाचा कहर, २४ तासांत सर्वाधिक रुग्ण मृत्युमुखी!