माँ कालीच्या अपमानावरून रशियाकडून हिंदूंचे समर्थन; युक्रेनला सुनावले खडेबोल

युक्रेनच्या संरक्षण विभागाने नुकतेच एक ट्विट केले होते, ज्यामध्ये स्फोटानंतर येणारा धूर माँ काली म्हणून दाखवून हिंदू धर्माची खिल्ली उडवली होती. या ट्वीटनंतर जगभरातील हिंदू समाजाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेत युक्रेनने हे ट्विट डिलीट केले. याच पार्श्वभूमीवर आता रशियाने भारताला पाठिंबा दिला.

माँ कालीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे भारतासह जगभरातील हिंदू समाजाने युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली. जगभरातून नाराजीचा सुर येत असतानाच या संपूर्ण कृतीबाबत युक्रेनच्यावतीने खेद व्यक्त करण्यात आला. शिवाय, युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी या घटनेबाबत ट्वीट करत माफी मागितली. अशातच आता युक्रेनच्या संरक्षण विभागाने हिंदू देवी माँ कालीची विटंबना केल्याप्रकरणी रशियाने युक्रेनच्या या कृत्याचा निषेध केला असून युक्रेनची तुलना नाझीवादाशी केली आहे. (Russia Support India Hindus Criticize Ukraine Over His Goddess Kali Depiction)

युक्रेनच्या संरक्षण विभागाने नुकतेच एक ट्विट केले होते, ज्यामध्ये स्फोटानंतर येणारा धूर माँ काली म्हणून दाखवून हिंदू धर्माची खिल्ली उडवली होती. या ट्वीटनंतर जगभरातील हिंदू समाजाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेत युक्रेनने हे ट्विट डिलीट केले. याच पार्श्वभूमीवर आता रशियाने भारताला पाठिंबा दिला.

‘कीवच्या सरकारला कोणाच्याही विश्वासाची पर्वा नाही, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स असो. युक्रेनियन सैनिक कुराण जाळत आहेत, माँ कालीची थट्टा करत आहेत आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांच्या पवित्र स्थळांचा नाश करत आहेत. त्यांचा फक्त नाझी विचारसरणीवर विश्वास आहे. तो युक्रेनला सर्वात वरचा मानतो’, असे युनायटेड नेशन्समधील रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पोलिंस्की म्हणाले.

दरम्यान, युक्रेन सरकारने आपल्या संरक्षण विभागाच्या ट्वीटबद्दल माफी मागितली आहे. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमिने जाप्रोवा यांनी एक निवेदन जारी केले होते. यामध्ये त्यांनी, ‘हिंदू देवी माँ कालीला चुकीच्या पद्धतीने दाखविल्याबद्दल आम्हाला आणि आमच्या संरक्षण विभागाला लाज वाटते. युक्रेन आणि युक्रेनचे लोक भारतीय संस्कृतीचा आदर करतात आणि त्यांच्या समर्थनाची प्रशंसा करतात. तो फोटो काढून टाकण्यात आला आहे आणि आम्ही परस्पर सहकार्य आणि परस्पर आदर वाढवण्यासाठी समर्पित आहोत’, असे म्हटले

नेमके प्रकरण काय?

स्फोटामुळे झालेल्या धुराच्या वरती देवी कालीचे कथित चित्र, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये दर्शविली आहे. माता कालीच्या गळ्यात कवटींची माळ आहे. @DefenceU ट्विटर हँडलने “वर्क ऑफ आर्ट” या शीर्षकाखाली हे चित्र पोस्ट केले आहे. यानंतर युक्रेनच्या या पोस्टवर भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेक भारतीय ट्वीटर युझर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि फोटो काढून टाकण्याची मागणी केली. लोकांनी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर असंवेदनशीलता आणि भारतीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यााबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणीही अनेकांनी केली. त्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हे ट्वीट डिलीट केले.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने 30 एप्रिल रोजी पोस्ट केला होता. आता हा फोटो डिलीट केल्यानंतरही सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


हेही वाचा – Ukraine : युक्रेनकडून अखेर दिलगिरी व्यक्त करत हिंदूंच्या भावना दुखावणारे ‘ते’ ट्वीट डिलिट