घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजग Corona Vaccine च्या ट्रायलच करतंय, तिकडे रशियानं Mass Vaccinationची तयारी चालवलीये!

जग Corona Vaccine च्या ट्रायलच करतंय, तिकडे रशियानं Mass Vaccinationची तयारी चालवलीये!

Subscribe

जगभरात आजघडीला कोट्यवधी कोरोनाचे रुग्ण आहेत. लाखो रुग्णांचा मत्यू झाला आहे. रोज लाखो रुग्णांची भर पडत आहे. आकडे रोज वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच कोरोनाच्या लसीची प्रतिक्षा असताना जगभरात किमान १०० लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र, २०२१पूर्वी कोणतीही लस उपलब्ध होणार नसल्याचं WHOनं जाहीर केल्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली असताना अनेक लसींवर ट्रायल सुरू झाल्या आहेत. पण असं असताना रशियाने याच महिन्यात १० ऑगस्टपर्यंत कोरोनावरची लस लाँच करणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे सगळ्यांचेच डोळे फिरले असताना आता रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी नवी घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये रशियामध्ये Mass Vaccination अर्थात व्यापक प्रमाणात रशियातल्या मोठ्या लोकसंख्येला कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता रशियाची लस कशी असेल आणि ती खरंच प्रभावी ठरेल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

लसीकरणाची सुरुवात डॉक्टर, शिक्षकांपासून

राऊटर्सने स्थानिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. रशियातल्या गमालेया इन्स्टिट्युट या सरकारी संशोधन संस्थेमध्ये कोरोनाच्या व्हॅक्सिनवर संशोधन सुरू आहे. मॉस्कोमधल्या या संस्थेमध्ये रशियाच्या कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू असून ती रजिस्टर करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीला ही लस फक्त डॉक्टर, शिक्षक यांनाच दिली जाणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, त्यासोबतच व्यापक प्रमाणात रशियन नागरिकांना लस देण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, रशियाच्या या दाव्यांवर अमेरिकेकडून आक्षेप घेतला जात आहे. ऑगस्टमध्ये ही व्हॅक्सिन लाँच करण्याची घोषणा करताना रशियाने ‘ज्याप्रमाणे १९५७मध्ये स्पुटनिक उपग्रह रशियाने अवकाशात सगळ्यात पहिल्यांदा सोडल्यानंतर अमेरिकेला आश्चर्याचा धक्का बसला होता, त्याचप्रमाणे कोरोनावरची लस देखील सगळ्यात पहिल्यांदा लाँच केल्यानंतरही अमेरिकेला तसाच धक्का बसेल’, असं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता रशिया राष्ट्रीय हेवेदाव्यांसाठी देशातील नागरिकांचं आरोग्यच पणाला लावतंय की काय? अशी टीका अमेरिकेकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -