घरदेश-विदेशRussia Ukraine conflict : युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियाच्या वाढत्या आक्रमणामुळे सुरक्षा परिषदेने...

Russia Ukraine conflict : युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियाच्या वाढत्या आक्रमणामुळे सुरक्षा परिषदेने दिली मान्यता

Subscribe

रशियावर अनेक देशांनी लादले निर्बंध

युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने रशियाचा वाढता आक्रमणाचा धोका लक्षात घेता देशात राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. यापूर्वी युक्रेनच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले होते की, युक्रेन डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेश वगळता सर्व युक्रेनियन प्रदेशात आणीबाणी लागू केली जाईल. युक्रेनचे उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, आणीबाणीची स्थिती 30 दिवस लागून असेल किंवा आणखी 30 दिवस वाढवली जाऊ शकते.

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पूर्व युक्रेनमधील दोन रशियन-समर्थित फुटीरतावादी प्रदेश – डोनेस्तक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक यांना एक “स्वतंत्र” देश म्हणून मान्यता दिली होती. तसेच पुतिन यांनी सोमवारी रात्री टेलिव्हिजनवरून देशाला संबोधित केले. यावेळी पुतीन म्हणाले की, रशियन सैन्य पूर्व युरोपमध्ये दाखल होतील आणि ते फुटीरतावादी प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करतील. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार, रशियन सैन्य लुहान्स्क आणि डोनेस्तकमध्ये शांतता राखण्यासाठी काम करतील. मात्र पुतीन यांच्या या निर्णयानंतर रशिया-युक्रेन तणाव अधिक शिगेला पोहोचला आहे.

- Advertisement -

रशियावर अनेक देशांनी लादले निर्बंध

रशियाच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी VEB आणि रशियन मिलिटरी बँक या दोन वित्तीय संस्थांवर निर्बंध लादले आहेत. रशियन अर्थव्यवस्थेचे काही भाग आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतून काढून टाकले जात असल्याचेही बायडेन यांनी सांगितले आहे. यासोबतच रशियातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निर्बंध लादले जाऊ शकतात.

जर्मनीने रशियाकडून ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ गॅस पाइपलाइनची प्रमाणपत्र प्रक्रिया थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मॉस्कोसाठी हा एक फायदेशीर करार होता आणि अमेरिकेने रशियन ऊर्जा पुरवठ्यावरील युरोपच्या वाढत्या अवलंबित्वावर टीका केली.

- Advertisement -

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी पाच रशियन बँकांवर आणि तीन हाय नेट वर्थ असलेल्या व्यक्तीं’वर निर्बंध लादल्याचे जाहीर केले. त्यांनी सांगितले की, रशियाच्या ज्या तीन अब्जाधीशांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांची ब्रिटनमधील संपत्ती गोठवली जात आहे आणि त्यांना ब्रिटनमध्ये येण्यापासून रोखले जाईल.


गुजरातमध्ये ६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -