Russia-Ukraine Conflict: यूक्रेनमध्ये तणाव अन् परिणाम भारतात, पेट्रोल-डिझेल, सोन्यासोबतच सर्वसामान्यांच्या कोणत्या गोष्टी महागणार?

russia ukraine conflict increased concern crude oil may cross 100 dollar know what effect on india gold price crossed 50 thousand silver price hike
Russia-Ukraine Conflict: यूक्रेनमध्ये तणाव अन् परिणाम भारतात, पेट्रोल-डिझेल, सोन्यासोबतच सर्वसामान्यांच्या कोणत्या गोष्टी महागणार?

रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे भारतासह काही देशांची चिंता वाढत आहे. दोन्ही देश युद्धाच्या सीमेवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे जर या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर प्रति बॅरल पार होऊ शकतात. आणि याचा थेट परिणाम इतर पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांवर होणार आहे. फक्त इंधनच नाही तर सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भारतातील सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे.

यूक्रेन तणावामुळे सोने-चांदी महागले

रशिया आणि यूक्रेनमधील वादाचा परिणाम शेअर बाजारासोबत कमोडिटी मार्केटवर होताना दिसत आहे. एमसीएक्सवर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा सोन ५० हजारावर गेले आहे. सोन्याच्या किंमतीत ७४ टक्क्यांनी वाढ झाली असून ५० हजार २८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर दुसऱ्याबाजूला चांदीचे भाव गगना भिडताना दिसत आहेत. चांदीच्या किंमतीत ०.४६ टक्क्यांनी वाढून ६४ हजार ५३१ रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. त्यामुळे येत्या काळात सोने-चांदी आणखीन महागण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार

यूक्रेनमधील तणावादरम्यान आंततराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमती आठ वर्षांनंतर १०० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचण्याची शक्यता आहे. कच्चे तेल २०१४ नंतर पहिल्यांदाच १०० डॉलर प्रति बॅरलच्या दिशेने जात आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ९६ डॉलर प्रति बॅरल आहे. पण आता १०० डॉलर प्रति बॅरल झाल्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकणार आहे.

वीज निर्मितीत कपात होण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते रशिया आणि यूक्रेनदरम्यान युद्ध झाले तर याचा नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम होईल. यामुळे देशांना वीज निर्मितीत मोठी कपात करावी लागू शकते.

शेअर बाजारावर मोठा परिणाम

रशिया आणि यूक्रेन युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्था आणि व्यापाराला फटका बसू शकतो. युद्धाच्या काळात पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने शेअर बाजार आणखी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांवर परिणाम होऊ शकतो.

दोन्ही देशामधील व्यापार होईल खंडीत

दरम्यान भारत युक्रेनला औषधी आणि इलेक्ट्रिकल मशिनरी यांसारख्या वस्तू विकतो, तर युक्रेनकडून खाद्यतेल ते खते आणि आण्विक अणुभट्ट्या यांसारख्या वस्तू खरेदी करतो. युद्ध झाले तर दोन्ही देशांमधला व्यापार होणार नाही आणि भारताची समस्या वाढेल.


हेही वाचा – Russia Ukraine dispute: अमेरिकेने रशियाची अट नाकारली; रशिया-यूक्रेनमध्ये आणखीन वाढला तणाव