घरताज्या घडामोडीRussia-Ukraine crisis : जर्मनीसह युरोपियन देशांचे रशियावर हवाई निर्बंध, मॉस्कोकडूनही अनेक देशांचे...

Russia-Ukraine crisis : जर्मनीसह युरोपियन देशांचे रशियावर हवाई निर्बंध, मॉस्कोकडूनही अनेक देशांचे हवाई मार्ग बंद

Subscribe

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपीय देशांकडून रशियाविरोधात भूमिका घेण्यात येत आहे. रशियाची घेरेबंदी आता सुरु करण्यात आली आहे. कॅनडा युरोपीय संघ (ईयू) ने सुद्धा विमानांसाठीचे हवाई मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच फूटबॉल असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, इग्लंड रशियाविरोधात सगळ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांचे बहिष्कार करेल तर फीफा परिषदकडून सांगण्यात आले आहे की, रशियाच्या राष्ट्रगीताचे गायन त्या मॅचमध्ये करण्यात येणार नाही ज्यामध्ये रशियाचा संघ भाग घेईल अशा प्रकारे रशियाची सर्वच स्तरातून कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

युरोपीय देशांनी आता रशियावर हवाई निर्बंध लागू केले आहेत. जर्मनी आणि युरोपीय देशांचे रशियावर हवाई निर्बंध आहेत. फ्रान्स जर्मनी, इंग्लंड इटली आणि कॅनडासह हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. दरम्यान रशियानेसुद्धा काही देशांसाठी हवाई मार्ग बंद केले आहेत. यूरोपीय संघात एकूण २७ देश आहेत. यामध्ये फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, अल्बानिया, ऑस्ट्रिया, पोलंड, स्लोवेनिया, इस्टोनिया, लातविया, लिथुअनिया, रोमानिया, अशा अनेक देशांमध्ये रशीयाच्या विमानांसाठी हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. फ्रांसीसी एयरलाइंस एयर फ्रान्सने सुरक्षेच्या कारणास्तव रशियाकडे जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

- Advertisement -

रशियाकडून या देशांसाठी हवाई मार्ग बंद

पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांना प्रत्युत्तर म्हणून रशियानेही लिथुआनिया, लात्विया, एस्टोनिया आणि स्लोवेनिया येथून येणार्‍या विमानांचे हवाई मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे. रशियाच्या राज्य हवाई वाहतूक एजन्सी रोसावियात्सियाने रविवारी सांगितले की रशियन विमानांसाठी हवाई मार्ग बंद केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. रशियाने रोमानिया, बल्गेरिया, पोलंड आणि चेक प्रजासत्ताक येथून येणार्‍या विमानांचे हवाई मार्गही बंद केले आहेत.

कॅनडाकडूनही हवाई मार्ग बंद

युरोपीय देशांच्या सोबत आता कॅनडाने रशियासाठी हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप स्पेन, सर्बिया, आणि तुर्कीसह इतर ईयू देशांनी रशियासाठी हवाई मार्ग बंद केले नाहीत. कॅनडाचे वाहतूक मंत्री ओमर अल्गाबारा यांनी देखील म्हटले आहे की त्यांचा देश युक्रेनवर विनाकारण केलेल्या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरेल.

- Advertisement -

हेही वाचा : भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -