युक्रेनचा रशियाच्या नौदलाच्या मोठ्या हवाई तळावर हल्ला

युक्रेनच्या सैनिकांनी रशियन नौदलाच्या मोठ्या तळावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नोवोफेडोरिव्का गावाजवळ असलेल्या रशियाच्या नौदलाच्या हवाई तळावर हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

युक्रेनच्या सैनिकांनी रशियन नौदलाच्या मोठ्या तळावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नोवोफेडोरिव्का गावाजवळ असलेल्या रशियाच्या नौदलाच्या हवाई तळावर हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केलेल्या घटनेला आज 165 दिवस होत आले आहेत. (Russia Ukraine war 165 day Ukraine attaked on Russian navy air force)

युक्रेनच्या हल्लाने पुतीन यांना मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्याबाबत रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियातून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोमध्ये रशियन नौदलाचा मोठा तळ युक्रेनच्या सैनिकांनी उडवून दिल्याचे दिसते आहे.

या हल्ल्याबाबत रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, साकी एअरबेसवर मोठा स्फोट झाला आहे. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात कोणतेही विमान उद्ध्वस्त झालेले नाही. तसेच, कोणीही जखमी झालेले नाही. या फोटोमध्ये

युक्रेनच्या हल्लायात कोणी जखणी न झाल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, या हल्ल्यामुळे संबंधित परिसरात आग लागली असून, ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे एअरफील्डमध्ये दारूगोळ्याचा मोठ्या प्रमाणात साठा होता. तसेच, या हल्ल्यात झालेल्या स्फोटाची तीव्रता त्या साठ्यापर्यंत पोहोचला नसल्याचा दावा रशियाने केला आहे.


हेही वाचा – 12 हजारांपेक्षा कमी किमतींच्या स्मार्टफोनवर येणार बंदी; भारताचा चीनला आणखी एक झटका