घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे ७ जणांचा मृत्यू; लुहान्स्कमधील २ शहरांवर...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे ७ जणांचा मृत्यू; लुहान्स्कमधील २ शहरांवर रशियाचा कब्जा

Subscribe

रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे विमानतळ आणि लष्करतळ उद्ध्वस्त केल्याचे रशियाने सांगितले आहे. तसेच रशियाने ५ विमानं नेस्तानाबूत केल्याची माहिती यूक्रेनने दिली आहे. असे असूनही युक्रेनने फक्त प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान रशियाने केलेल्या युक्रेन हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच युक्रेनच्या पश्चिम क्षेत्रापर्यंत रशियाचे मिसाईल पोहोचले आहे.

सुरक्षेची चिंता व्यक्त करत डेन्मार्कच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये आपले दूतावास बंद केले आहेत. युक्रेनमध्ये मार्शल लॉ घोषित केला आहे. शिवाय राजधानी कीवमधून लोकांनी दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली आहे. रशिया मीडियाने दावा केला आहे की, युक्रेनच्या सीमेमध्ये रशियाच्या सैनिकांनी प्रवेश केला आहे. तसेच सर्व अहमद मोर्चेंहून युक्रेनचे सैन्य मागे हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे युक्रेनच्या लुहान्स्क क्षेत्रात आतापर्यंत दोन शहरांवर रशियाने कब्जा केल्याचे रॉयटर्सने सांगितले आहे.

- Advertisement -

अमेरिका आणि चीन काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी रशिया हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बायडेन म्हणाले की, ‘या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि नुकसान याला जबाबदार फक्त रशिया असेल. अमेरिका आणि त्यांचे सहाय्यक एकजुटीने प्रत्युत्तर देतील.’ तर यूएनमध्ये चीनचे राजदूत Zhang Jun म्हणाले की, ‘संयम बाळगून तणाव जास्त वाढण्यापासून रोखले पाहिजे.’

- Advertisement -

रशियन सैन्य काय म्हणाले?

युक्रेनमधील सैन्याच्या कारवाईवर रशियन सैन्य म्हणाले की, ‘युक्रेनचे विमानतळ, लष्करी तळ यांना निशाणा बनवले आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला निशाणा बनवलेले नाही.’


हेही वाचा – Russia Ukraine War: रशियाने मिसाईलने युक्रेनचे विमानतळ आणि लष्करी तळ केले उद्ध्वस्त; ५ विमानं पाडली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -