घरदेश-विदेशukraine russia war : युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी जगभरातील तब्बल 16,000 स्वयंसेवकांचा अर्ज,...

ukraine russia war : युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी जगभरातील तब्बल 16,000 स्वयंसेवकांचा अर्ज, युक्रेनियन महिलांनीही घेतली हातात शस्त्रे

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये सलग 13 दिवसांपासून युद्धाची घमासान सुरु आहे. बलाढ्य रशियाला हरवण्यासाठी युक्रेनियन सैन्यही पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत धैर्याने लढत आहेत. दरम्यान आज दोन्ही देशांमधील युद्धविरामावरील चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी असे चार मोठे देश चर्चा करणार आहेत. मात्र रशियाने आत्तापर्यंत युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर हल्ले करत संपूर्ण शहर उद्धवस्त केली आहे. पण आता युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी जगभरातील तब्बल 16,000 स्वयंसेवकांनी अर्ज केले आहेत, ज्यात दोन माजी भारतीय नौदल अधिकारी आहेत. दुसरीकडे, तामिळनाडू वंशाच्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याने युक्रेनमध्ये राहून रशियाविरुद्ध लढण्यासाठी आधीच शस्त्र उचलले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या दोन माजी सैनिकांनी हे अर्ज युक्रेनच्या डिफेन्स अटॅचला पाठवली आहेत. एका अधिकाऱ्याने एक अर्ज केला, नौदलात 23 वर्षांचा मेकॅनिकल सिस्टीमचा अनुभव असल्याचे त्या माजी सैनिक त्यात सांगितले. त्याला युक्रेनच्या सैन्यात त्वरित सामील व्हायचे आहे. आणखी एका माजी अधिकाऱ्यानेही असेच पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

पत्र लिहिल्यानंतर हे अधिकारी युक्रेनियन अधिकाऱ्याला भेटले, जिथे त्यांचे पासपोर्ट, अनुभवाची कागदपत्रे आणि इतर गोष्टी आणि नावे, पत्ते, फोन नंबर इत्यादी नोंदवले गेले. युक्रेन सरकारने अद्याप त्यांची विनंती मान्य करण्यास औपचारिकपणे सहमती दर्शवलेली नाही.

तामिळनाडूतील 21 वर्षीय रविचंद्रन युद्धात झाला सहभागी

- Advertisement -

तामिळनाडूतील 21 वर्षीय सानिकाशन रविचंद्रन जॉर्जियन नॅशनल लीजनमध्ये सामील झाला आहे. युक्रेनसाठी निमलष्करी दल म्हणून रशियाशी युद्ध करणे हे या सैन्याचे कार्य आहे. रविचंद्रन खारकीवच्या नॅशनल एरोस्पेस विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेले. मद्रास क्लबमध्ये तो औपचारिक पायलट होता. त्याने सोशल मीडियावर युक्रेनच्या ध्वजासह ‘युक्रेनच्या प्रतिष्ठेसाठी… जयहिंद’ असा संदेश पोस्ट केला.

दरम्यान युक्रेनच्या स्वातंत्र्यांसाठी लढण्यासाठी आता युक्रेनियन महिलांनी देखील हातात शस्त्रे घेतली आहेत. रशियाच्या आक्रमणानंतर मोठ्या संख्येने युक्रेनियन महिलांनी सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सद्या युक्रेनमध्ये 31,000 महिला सैनिक आहेत. त्यापैकी 4000 महिला सैनिक अधिकारी पदावर आहेत.


LAC वरील वाद मिटवण्यासाठी भारत -चीनमध्ये पुन्हा चर्चा; 11 मार्चला चर्चेचा 15 वा टप्पा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -