Russia Ukraine War : रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या इंधनाचे दर

रशिया आणि युक्रेनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत कच्च्या तेलाचे दर १११.५ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचेले आहेत. काल गुरूवारी कच्च्या तेलाचे दर ११७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचेले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा खेळ सुरू असतानाच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबईत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०९.९८ रूपये तर डिझेल ८४.२४ रूपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०१.४० आणि ९१.४३ रूपये लीटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९५.४१ रूपये एवढे असून डिझेलसाठी ८६.६७ रूपये मोजावे लागत आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १२ रूपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेल कंपनींच्या नुकसान भरपाईसाठी इंधनाचे दर वाढवणे गरजेचे आहे. असा दावा आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात करण्यात आला आहे.

युद्ध थांबले नाही तर काय?

इराण हा जगातील नवव्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. परंतु देशावर आर्थिक निर्बंधांमुळे त्याच्या क्षमतेपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि संघर्षामुळे आगामी काळात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्चचे प्रमुख रवींद्र राव म्हणाले की, एका आठवड्यात कच्च्या तेलात २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि बाजारातील खेळाडू आता रॅली सुरू ठेवण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन करत आहेत. जोपर्यंत तणाव कमी करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत किमती वाढतच राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Nawab Malik : हसीना पारकरला पैसे दिल्यानंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट