घरताज्या घडामोडीयुद्धात व्यस्त असलेल्या रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, चीनने तोंड फिरवल्यामुळे भारताला मदतीची...

युद्धात व्यस्त असलेल्या रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, चीनने तोंड फिरवल्यामुळे भारताला मदतीची हाक

Subscribe

युक्रेनसोबत गेल्या अडीच महिन्यांपासून व्यस्त असलेल्या रशियाने भारताकडून आता वैद्यकीय उपकरणांची मागणी केली आहे. भारतातील आणि रशियातील वैद्यकीय उपकरणे निर्माण करणारी कंपनी २२ एप्रिल रोजी व्हिसीद्वारे बैठक आयोजित करु शकतात. रशियामधील वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे भारताकडे मदत करण्याची मागणी होऊ शकते. पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशामध्ये रशियात वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण झालाय. चीनने मदत करण्याचे टाळले असल्यामुळे रशियाच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत.

इंडियन मेडिकल डिवाइस इंडस्ट्री असोसिएशनचे समन्वयक राजीव नाथ म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी चर्चा होईल. नाथ यांच्या माहितीनुसार रशियाच्या वैद्यकीय उपकरणांच्या बाजारात भारताचा फारसा मोठा वाटा नाही. परंतु रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे भारताचा वाटा १० टक्क्यांनी वाढू शकतो. भारताकडून रशियाला वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीमध्ये २ अरब रुपयांची वाढ होऊ शकते. हा व्यापार रुपया आणि रुबलमध्ये होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादले आहेत. आर्थिक निर्बंध लादल्यामुळे रशियाला आंतरराष्ट्रीय बाजारात जगातील कोणत्याही देशासोबत वैध चलन असलेल्या अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार करता येत नाही आहे. रशियाच्या बँका, व्यापारी, कंपनी समूह, वित्तीय संस्था यांच्यावर निर्बंध आहेत. परंतु भारताने युद्धादरम्यान तटस्थ धोरण अवलंबल्यामुळे आणि रशियाशी पारंपारिकपणे जुने संबंध असल्यामुळे सहकार्य करण्याचा मार्ग शोधला आहे. यामधील एक पर्याय म्हणजे डॉलरला बाजूला ठेवत रशिया आणि भारताच्या चलनामध्ये व्यपार करण्याचा आहे.

दरम्यान भारताने यापूर्वीच व्यापार सुरु केला आहे. भारताने मागील आठवड्यात चहा, तांदूळ, फळ, कॉफी आणि समुद्रातील उत्पादनाची पहिली खेप निर्यात केली आहे. ही खेप जॉर्जियाच्या बंदरावर उतरवण्यात येणार आहे. तिथून रशियाकडे पाठवण्यात येणार आहे. या व्यापारादरम्यान रशियाची सर्वात मोठी कर्जदाता एसबर बँक भारताला रशियाच्या चलनामध्ये मोबदला देणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही”; एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट लिहित आत्महत्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -