Russia-Ukraine War: पुतिनच्या सैन्याला मोठा धक्का; युक्रेन युद्धात रशियाच्या मेजर जनरलचा मृत्यू

Russia-Ukraine War: Major General of Russia dies in Ukraine war, Putin’s army gets biggest blow ever
Russia-Ukraine War: पुतिनच्या सैन्याला मोठा धक्का; युक्रेन युद्धात रशियाच्या मेजर जनरलचा मृत्यू

रशियन सैन्य युक्रेनवर जोरदार हल्ला करत आहे. गेल्या तीन दिवसात रशियन मिसाईलमुळे किव आणि खारकिवची परिस्थिती गंभीर झाली आहे. युक्रेनचे खेरसोन शहर आता रशियाच्या ताब्यात आले आहे. परंतु या लढाईमुळे युक्रेनसोबत रशियाचे मोठे नुकसान होत आहे. या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याला मोठा झटका बसला आहे. रशियाचे मेजर जनरल रँकचे अधिकारी आंद्रेई सुखोवेत्स्की यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान युक्रेनमधून फक्त सैन्य नाही तर २० हजारांहून अधिक लोकं या युद्धाच्या मैदानात उतरले असून त्यांना युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी हत्यारे दिली आहेत.

रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्स्की यांचा मृत्यू झाल्याची माहिती पूर्व युरोपियन मीडिया प्लॅटफॉर्म NEXTAने दिली आहे. गेल्या गुरुवारी सुरू झालेल्या युद्धाला आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध हे शिगेला पोहोचले आहे. यादरम्यानच पुतिनच्या सैन्याला आंद्रेई यांच्या जाण्याने मोठा झटका बसला आहे.

दरम्यान बुधवारी रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत युक्रेनचे ४९८ सैनिक मारले आहेत आणि १५९७ सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मेजर जनरल इगोर कोनाशेनकोव यांनी या बातम्या फेटाळल्या आहेत, ज्यामध्ये रशियाचे खूप मोठे नुकसान झाल्याचा दावा केला होता. मेजर यांनी जे आकडे जारी केले ते रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितलेल्या आकड्यांपेक्षा खूप जास्त आहेत. कोनाशेनकोव म्हणाले की, युक्रेनचे २,८७९ हून अधिक सैनिक मारले गेले आहेत आणि जवळपास ३,७०० जखमी झाले आहेत. तर ५७२ जणांना कैद केले आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War: UNGAमधील मतदान प्रक्रियेत ‘या’ पाच देशांनी उघडपणे रशियाला दिला पाठिंबा