घरदेश-विदेशRussia Ukraine War : McDonalds चे रशियातील 850 आऊटलेट्स बंद, हजारो कर्मचारी...

Russia Ukraine War : McDonalds चे रशियातील 850 आऊटलेट्स बंद, हजारो कर्मचारी बेरोजगार?

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 14 दिवसांपासून घमासान युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर तीव्र हल्ले केले, यामुळे शहरच्या शहरं उध्वस्त झाली आहेत. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यावर आता जगभरातून नाराजी व्यक्त होतेय. आत्तापर्यंत अनेक देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. तर अनेक मोठ्या कंपन्या आता रशियाविरोधात निर्णय घेत युक्रेनला पाठिंबा देत आहेत. यात आता मॅकडोनाल्ड्स कंपनीनेही रशियामधील 850 आऊटलेट्स तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली, मात्र चर्चेच्या या फेरीतून काहीच हाती आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मॅकडोनाल्ड्सने रशियातील 850 आऊटलेट्समधील कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले. ज्यात कंपनीचे अध्यक्ष आणि साईओ क्रिस केम्पझिंस्की यांनी लिहिले की, मॅकडोनाल्ड्स युक्रेनवर सुरु असलेल्या रशिय हल्लांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे आम्ही रशियातील मॅकडोनाल्ड्सची 850 आऊटलेट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांचा विचार करता आऊटलेट्स बंद असली तरी रशियामधील सर्व 62 हजार कर्मचाऱ्यांना पगार सुरु असेल असे सांगितले आहे.

- Advertisement -

रशियातील 84 टक्के आऊटलेट्स मॅकडोनाल्ड्सच्या मालकीची आहेत. गेल्यावर्षी कंपनीच्या महसूलात रशिया आणि युक्रेनचा वाटा 9 टक्के असल्याचे स्पष्ट केले. तर याआधी केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) कंपन्यांनीही रशियातील गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेत युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


Apple ने लाँच केला 128 GB RAM चा Mac Studio; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -