घरदेश-विदेशrussia ukraine war : युक्रेनसोबत चर्चा करण्यास रशियाची तयारी, मात्र घातली 'ही'...

russia ukraine war : युक्रेनसोबत चर्चा करण्यास रशियाची तयारी, मात्र घातली ‘ही’ अट

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनवर स्फोटकांचा मारा करत मोठे नुकसान केले आहे. यात अनेक जवान शहीद झाले आहेत. या विध्वंसानंतर आता रशिया युक्रेनसोबत चर्चा करण्यात तयार झाला आहे. रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवल्यास पुन्हा चर्चा होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.

युद्धाच्या विध्वंसानंतर चर्चेचा प्रस्ताव

काल युक्रेनवर मोठी लष्करी कारवाई केल्यानंतर रशियाने हा मोठा प्रस्ताव दिला आहे. युक्रेन लवकरच हा प्रस्ताव स्वीकारणार नसून परिस्थिती पाहता यावर तोडगा निघू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. युक्रेनला गुडघे टेकवायला लावयचे आणि नंतर शरणागती पत्करायला लावायची ही रणनीती रशियाकडे आधीच होती. रशियाच्या या ऑफरवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या बाजूने चर्चेचा प्रस्तावही पुतिन यांना देण्यात आला आहे. त्यांनी पुतीन यांना वाटाघाटीच्या टेबलावर बोलावले आहे. पुतिन यांनीही त्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवण्याबाबत स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, युक्रेनच्या रहिवासी राहत असलेल्या भागांवर सैन्याकडून हल्ले केले जात नाहीत. तसेच पायाभूत सुविधांचे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र आतापर्यंत रशियाने केलेल्या कारवाईविरोधात युक्रेनियन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तर रशियाचे नागरिक देखील रस्त्यावर उतरून रशियन राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांचा निषेध करत आहेत. रशियामध्ये आतापर्यंत 1700 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात निदर्शने

रशियाशिवाय अमेरिकेतील व्हाईट हाऊसबाहेर युक्रेनवर झालेल्या हल्ल्याविरोधात निदर्शने करण्यात आली. त्याचवेळी आज संध्याकाळी भारतातील रशियाच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. वाढत्या विरोधानंतर रशियाने पुन्हा युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. कालच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्रे टाकली तर युद्ध थांबवले जाईल, असे सांगितले. मात्र लढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितलं होतं. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या कारवायांमुळे त्यांच्या देशाला धोका होता, म्हणून त्यांनी या लष्करी कारवाईला मान्यता दिली.

- Advertisement -

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले की, बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था आरआयए नोवोस्तीनुसार, प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, ही चर्चा युक्रेनला “तटस्थ स्थिती” घोषित करण्याबाबत असेल तसेच सैन्य कमी करण्याबाबत असेल.

युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये, अशी रशियाची इच्छा आहे. युक्रेन संकटाबाबत रशियाची अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांशी चर्चा सुरू असतानाही युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करू नये ही रशियाची प्रमुख मागणी होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेचे आवाहन केले आहे. याआधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवेपर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.


Space Station भारतावर पाडायचे की चीनवर?; रशियन स्पेस एजन्सीची थेट अमेरिकेला धमकी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -