घरदेश-विदेशRussia Ukraine War : 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 240 भारतीयांना घेऊन बुडापेस्टहून तिसरे...

Russia Ukraine War : ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत 240 भारतीयांना घेऊन बुडापेस्टहून तिसरे विमान दिल्लीला पोहोचले

Subscribe

युक्रेन आणि रशियामधील युद्ध अद्याप सुरुच आहे. मात्र या युद्धामुळे अनेक देशातील नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. मात्र भारत सरकारने आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या 240 भारतीयांना घेऊन बुडापेस्टहून एअर इंडियाचे तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 240 भारतीय नागरिकांना घेऊन ऑपरेशन गंगा अंतर्गत तिसरं विमान बुडापेस्ट(हंगेरी)हून दिल्लीला पोहचले आहे. असं ट्विट त्यांनी केले आहे.

मृत्यूच्या दाडेतून सुखरूप मायदेशी परतल्याचा भावना युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी हंगेरी मार्गे युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या भारतीयांचे विमानतळावर स्वागत केले आहे.

- Advertisement -

युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून आज युद्धाच्या चौथ्या दिवशीही हल्ले होत आहेत. अशा परिस्थिती युक्रेनमधून आत्तापर्यंत 16 भारती नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान भारत सरकारने भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ या मिशनची सुरुवात केली आहे.

- Advertisement -

युद्धग्रस्त युक्रेनमधून आत्तापर्यंत 709 भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 250 नागरिकांना रविवारी आणि 219 नागरिकांना शनिवारी संध्याकाळी दिल्लीत पोहचवण्यात आले. या युद्धजन्य परिस्थिती भारतीय दूतावासाने एक अॅडव्हायजरी जाहीर करत भारतीय नागरिकांना सीमेवर न जाण्याचे आवाहन केले आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत आम्ही 1000 भारतीयांना मायदेशी परत आणत आहोत. अजूनही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणले जात आहे. भारत सरकार त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. जिथे कुठेही अडचण असेल, तिथे आम्ही आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


जे.पी.नड्डा यांचे हॅक झालेले ट्विटर अकाऊंट पुन्हा पूर्ववत; हॅकर्सकडून ट्विटमध्ये युक्रेनचा उल्लेख

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -