Russia-Ukraine War: रशियन सैन्य साध्या वेशात कीवमध्ये करतंय घुसखोरी, शेतात लपवली हत्यारे

काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात रशियन सैनिक साध्या वेशात कीव शहराकडे आगेकूच करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रशियन सैन्याने शेतात आपली हत्यारे देखील लपवून ठेवली आहेत.

russia ukraine war vladimir putin troops infiltrate in kyiv म
Russia-Ukraine War: रशियन सैन्य साध्या वेशात कीवमध्ये करतंय घुसखोरी, शेतात लपवली हत्यारे

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा १५वा दिवस आहे. रशियात सध्या पुतिनची सेना शिकंजा राजधानीच्या दिशेने जात आहेत. रशियाने युक्रेनमधील परिस्थिती बिघडवली असली तरी सध्या हे शहर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नियंत्रणात आहे. असे असले तरी रशियाचे सैन्य सध्या साध्या वेशात युक्रेनमध्ये शिरत असल्याचे समोर आले आहे. याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात रशियन सैनिक साध्या वेशात कीव शहराकडे आगेकूच करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रशियन सैन्याने शेतात आपली हत्यारे देखील लपवून ठेवली आहेत.

व्हिडीओ फुटेजमध्ये रशियन टँक इरपिन शहराकडे जाताना दिसत आहे. या शहरात मागील १० दिवसांपासून रशियाकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. इरपिन हे शहर युक्रेनची राजधानी कीव पासून २० किमी दूर आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीवला घेरण्यापासून मागे हटणार नाही अशी चेतावणी बुधवारी रशियाने युक्रेनला दिली आहे. रशियन सैनिक कोणत्याही परिस्थितीत युक्रेनवर हल्ला करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

शेतात लपवली हत्यारे

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीच्या उत्तर-पश्चिम भागातील युद्ध सुरूच आहे. पुतिनचे सैनिक चेर्निहाइव्ह फील्ड आणि निवासी इमारतींमध्ये हत्यारे लपवत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. त्याचप्रमाणे रशियन सैनिक साध्या वेशात माइकोलाइव्ह शहराच्या दिशेने जात आहेत.

लहान मुलांच्या रुग्णालयावर हल्ला

डेलीमेलच्या वृत्तानुसार, रशिया युक्रेनच्या अनेक भागांमध्ये अंदाधुंद गोळीबार करत आहेत त्यामुळे येत्या काळात युक्रेनवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी रशियाने मारियुपोलमधील एका लहान मुलांच्या रुग्णालयावर गोळीबार केला ज्यात १७ लोक जखमी झाले. या घटनेचे काही फोटो समोर आले होते. त्यानुसार, शवगृहातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मृतदेह कब्रस्तानात दफन करावे लागले.


हेही वाचा – बापरे! आता Russia-Ukraine War मध्ये Chemical Attack करण्याचे प्लॅनिंग