Corona Vaccine : रशिया ४० हजार लोकांवर करणार लसीचा प्रयोग

corona vaccine not this year britain minister dominic raab oxford university

जगभरात पसरलेल्या कोरोना संकटावर रशिया या देशाने पहिली लस विकसित केल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना विषाणूवरील लसीच्या चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा केली होती. तर पुढील आठवड्यात या लसीची अखेरच्या टप्प्यातील चाचणी घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, रशियाने तब्बल ४० हजार जणांना ही लस देण्याचा निर्णय घेतला आहे. एका परदेशी संशोधन संस्थेच्या देखरेखीत ही चाचणी होणार आहे.

रशियाने लस सापडली असल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी त्यावर शंका उपस्थित केल्या होत्या. रशियाने कोरोनावरील लसीचे नाव ‘स्पुटनिक व्ही’ ठेवले आहे. जगात सोव्हिएत रशियाने पहिल्यांदा ‘स्पुटनिक’ हा उपग्रह सोडला होता. त्याच्याच नावावरून या कोरोना लसीला नाव देण्यात आले आहे. याबाबत रशियाचे थेट गुंतवणूक निधीचे मुख्य अधिकारी किरील दिमित्रीव यांनी माहिती दिली की, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत लसीबाबत एका संशोधन नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे.

रशियाकडे एक अब्ज डोसची ऑर्डर नोंदवण्यात आली आहे. सध्या रशियाकडे ५० कोटी डोस निर्मिती करण्याची क्षमता आहे. लस विकसित करणाऱ्या मॉस्कोच्या गमलेया इन्स्टिट्यूटनुसार, जवळपास ४० हजार लोकांवर ४५ केंद्रावर चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल जागतिक आरोग्य संघटना WHO ला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –

Khel Ratna Award: रोहित शर्मासह ‘या’ चौघांना मिळणार ‘खेलरत्न’ पुरस्कार