Vladimir Putin India Visit: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन ६ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार

Russian President Vladimir Putin to visit India on 6 December for annual summit with PM Modi
Vladimir Putin India Visit: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन ६ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन (President Vladimir Putin) भारत दौऱ्यावर येत आहेत. ६ डिसेंबरला राष्ट्रपती पुतिन भारतात येतील. यादरम्यान भारत आणि रशिया दरम्यान होणाऱ्या चर्चेची तारीख घोषित करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) माहिती देत सांगितले की, ६ डिसेंबरला भारत आणि रशियामध्ये टू प्लस टू संवाद होईल. याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी (Arindam Bagchi) दिली. ते म्हणाले की, ‘दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक होणार आहे.’

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या भारत दौऱ्याबाबत अनेक तर्क-विर्तक लावले जात होते. पण आता या सर्व तर्क-विर्तक आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वी दोन्ही देशांनी पुतिन यांच्या दौऱ्याबाबत मौन धारण केले होते. पण आता मौन सोडून व्लादिमिर पुतिन ६ डिसेंबरला भारतात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, या द्विपक्षीय बातचितमध्ये राजकीय आणि संरक्षणाविषयक मुद्द्यांवर बोलले जाईल. भारत आणि रशियामध्ये टू प्लस टू संवाद होईल. पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये ६ डिसेंबरला होईल. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हे रशियाचे प्रतिनिधित्व करतील.


हेही वाचा – कोरोनामुळे New York ‘ऑउट ऑफ कंट्रोल’; राज्यपालांनी ‘Disaster Emergency’ केली घोषित