घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: पुतीन यांची Military Operationची घोषणा; युक्रेन सैन्याला दिले शस्त्र टाकण्याचे...

Russia-Ukraine War: पुतीन यांची Military Operationची घोषणा; युक्रेन सैन्याला दिले शस्त्र टाकण्याचे संकेत

Subscribe

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेन (Ukraine) विरोधात सैन्याला स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. शिवाय युक्रेनच्या सैन्याला आपले शस्त्रे खाली ठेवून घरी जा, अन्यथा रक्तपात अटळ असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. तसेच जो कोणी रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करेल त्याची खैर नाही, असे पुतीन म्हणाले. याबाबतची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनी दिली आहे. पण आता रशियाच्या घोषणेमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

पुतीन म्हणाले की, ‘युक्रेनवर कब्जा करण्यासाठी रशियाची कोणतीही योजना नाही. परंतु रशिया कोणत्याही बाहेरील धोक्याला त्वरित उत्तर देईल.’ यादरम्यान युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या संकटामध्येच युक्रेनने बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे. सध्या युक्रेनच्या संकटावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) आपात्कालीन सत्र सुरू आहे. या आठवड्यातील हे दुसरे सत्र सुरू आहे.

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणारे टी.एस तिरुमूर्ती म्हणाले की, ‘आम्ही तत्काळ डी-एस्केलेशनचे आव्हान करतो. ही परिस्थिती एका मोठ्या संकटात आहे. जर ही सावधपणे सांभाळली नाही, तर सुरक्षा कमजोर होईल. सर्व पक्षांना सुरक्षेबाबत लक्ष ठेवले पाहिजे. आज सकाली ७.४५ मिनिटांतील कीवहून उड्डाण झालेल्या युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचे एक स्पेशल विमान दिल्ली विमनतळावर उतरले. यामुळे विद्यार्थ्यांसह १८२ भारतीय नागरिक मायदेशी परतले.’

- Advertisement -

तसेच युएनमध्ये अमेरिका म्हणाले की, ‘आम्ही रशियाला एकत्रपणे उत्तर देणे कायम ठेवू. आम्ही येथे रशिया थांबवण्यास, सीमेवरून परत जाण्यास, सैनिक माघार घेण्यास सांगण्यासाठी आलो आहोत. रशियाने युक्रेनच्या सार्वभोमत्वाचे उल्लंघन केले आहे.’ संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, ‘रशियाकडून एक ऑपरेशन तयार केले जात आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखावे. शांतीसाठी संधी द्या.’


हेही वाचा – पीएम मोदी युक्रेनवर म्हणाले, जगभरात अशांतता असताना आज भारतासाठी मजबूत होणे महत्त्वाचे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -