Russia-Ukraine war: रशियाकडून युक्रेनमधील शाळेवर बॉम्बहल्ला, ६० जणांच्या मृत्यूची शक्यता

मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क भागातील शाळेवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियन सैन्याने शनिवारी दुपारी बिलोहोरीयेव्का येथील शाळेवर बॉम्ब हल्ला टाकला आणि इमारतीवर आग लावली. यामुळे जवळपास ९०० लोक येथे आसरा घेत होते, असं गव्हर्नर सेर्ही गैडाई यांनी सांगितले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. रशिया युक्रेनवर अतिशय आक्रमक हल्ले सुरू आहेत. सध्या रशियाने आपला मोर्चा युक्रेनच्या पूर्व प्रांताकडे वळवला आहे. युक्रेनही या रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचं चित्र आहे.

सुमारे चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यावर अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. त्यानंतर ढिगारा हटवण्यात आला. मात्र, या ढिगाऱ्याखाली दुर्दैवाने दोन मृतदेह सापडले. यावेळी ३० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सात जण जखमी झाले आहेत.

लुहान्स्क प्रांताचे गव्हर्नर सेरहिय हैदई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींच्या मृत्यूची खात्री पटवण्यात आली असून इतर मृतांबाबत माहिती घेतली जात आहे. या हल्ल्यात किमान ६० मृत्यू झाल्याची शंका प्रशासनाने वर्तवली आहे. सध्या या ठिकाणी ढीगारा हटवण्याचं काम सुरू आहे. यानंतर मृतांचा नेमका आकडा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशियन सैन्याने काल शनिवारी दक्षिण युक्रेनमधील ओडेसा शहरावर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आणि मारिओपोलमधील वेढलेल्या स्टील प्लांटवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. रशिया विजय दिनाच्या सोहळ्यापूर्वी हे बंदर ताब्यात घेईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी लोकांना हवाई हल्ल्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा : Delhi Capitals Covid : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंबाबत कोरोनाचा अहवाल जाहीर, सामना होणार की नाही?