घरदेश-विदेशयुक्रेनमध्ये रशियन सैन्यांवर उपाशी मरण्याची वेळ; खातायत प्राणिसंग्रहालयातील प्राणी

युक्रेनमध्ये रशियन सैन्यांवर उपाशी मरण्याची वेळ; खातायत प्राणिसंग्रहालयातील प्राणी

Subscribe

युक्रेनमधील युद्ध परिस्थितीबाबत रोज नवे खुलासे केले जात आहेत. अशात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सैनिक खाण्यास काही मिळत नसल्याने युक्रेनच्या युद्धक्षेत्रातील प्राणीसंग्रहालयातील प्राणी मारून खात असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यासह काही फोटो देखील शेअर केले जात आहेत. या घटनेवरून पुतिन यांच्या सैनिकांची बदनामी केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

प्राणीसंग्रहालयात सापडले पुरावे

‘एक्स्प्रेस यूके’ या ब्रिटीश न्यूज वेबसाईटमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रशियन सैनिक युक्रेनमधील त्यांच्या नियंत्रणाखालील भागातील प्राणीसंग्रहालयात बंदिस्त प्राण्यांना घेऊन जात आहेत. आणि हे प्राणी मारून खात आहेत. या प्राण्यांमध्ये उंट, कांगारू, डुक्कर आणि लांडगे यांसारख्या आणखी बरेच प्राणी आहेत. या अहवालात अनेक प्राण्यांचे सांगाडे आणि इतर अवशेष सापडले आहेत. मात्र प्राण्यां अशाप्रकारे मारून खाण्याच्या गुन्ह्याबाबत रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

- Advertisement -

पूर्व डोनेट्स्कमधील यम्पिल प्राणीसंग्रहालयाच्या स्वयंसेवकांनी दावा केली की, युक्रेनवरील आक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसांत रशियाने याम्पिल गावाचा ताबा घेतला, पण 30 सप्टेंबर रोजी युक्रेनने हा ताबा परत मिळवला. मात्र युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरात परतताना अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान एका स्वयंसेवकाने प्राणीसंग्रहालयाच्या मैदानावर प्राण्यांचे विखुरलेले सांगाडे आणि मांसाचे तुकडे आपल्या कॅमेरात कैद केले आहेत, याबाबतचे वृत्त समोर येताच प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रशियावर नाराजी व्यक्त केली आहे.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियन सैनिकांनी आमच्या अनेक प्राण्यांना मारून खाल्ल्याचे वृत्त खरे आहे. त्याच्या यादीनुसार आणि मिळालेल्या पुराव्यानुसार, आतापर्यंत दोन उंट, एक कांगारू, एक रान म्हैस, काही डुकरे आणि अनेक लांडग्यांची शिकार झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील उर्वरित प्राणी पुनर्वसनासाठी निप्रो सिटी येथे नेले जात आहेत.

- Advertisement -

सुमारे 11,000 लोकसंख्या असलेल्या याम्पिल क्षेत्राला सप्टेंबरमध्ये रशियाच्या ताब्यापासून मुक्त करण्यात आले होते, ही बातमी मिळाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या विशेष युनिट्सचे कौतुक करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.


मुंबईतील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; 15 ते 20 दुकानं जळून खाक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -