घरताज्या घडामोडीहिंदी महासागराच्या वरती तुडले रशियाचे रॉकेट, तुकड्यांचा सॅटेलाईट्सना धोका!

हिंदी महासागराच्या वरती तुडले रशियाचे रॉकेट, तुकड्यांचा सॅटेलाईट्सना धोका!

Subscribe

रशियन स्पेस एजन्सीच्या रॉकेटचा वरचा भाग अवकाशात तुटला असल्याचं समोर आलं आहे. आता त्यातून निघणार कचरा हा पृथ्वीच्या कक्षेत पसरला आहे. ८ मे रोजी रशियन रॉकेट हिंद महासागरच्यावर तुडले आणि त्याचे ६५ तुकडे हे पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत. त्यामुळे या तुकड्यांचा धोका सॅटेलाईट्सना आहे. हे तुकडे सॅटेलाईट्सना नुकसान पोहोचवू शकतात.

रशियाच्या स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉस मते, या रशियन रॉकेटचं नाव फ्रीगेट-एसबी (Fregate-SB) आहे. २०११ मध्ये या रॉकेटने रशियाचे सॅटेलाईट स्पेक्टर आर (Spektr-R)ला अवकाशात स्थापित करण्यास मदत केली होती. पण या सॅटेलाईटने गेल्या वर्षी काम बंद केले.

- Advertisement -

८ मे रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० ते ११:३० दरम्यान हे रॉकेट हिंद महासागराच्या वरती तुटले, अशी माहिती रॉसकॉसमॉसने दिली आहे. आता या रॉकेटचा तुटलेला कचरा पृथ्वीच्या कक्षेत तरंगत आहे. रशियन स्पेस एजन्सी आता या रॉकेटच्या किती भाग तुटला आहेत? याचा शोध घेत आहे.

अमेरिकेच्या यूएस १८ स्पेस कंट्रोल स्क्वाड्रनने सांगितलं की, रॉकेट तुटल्यांतर ६५ तुकडे त्यांनी पाहिले आहे. जे पृथ्वीच्या वरती फिरत आहे आणि हे सॅटेलाईट्साठी धोक्याचे आहे. सध्या या ६५ तुकड्यांची दिशा आणि गती इत्यादी ट्रॅक करत आहेत. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी ईएसए (ईसा) रशियाच्या रॉकेटच्या तुकडे ट्रॅक करत आहेत. कारण सॅटेलाईट्सना धोका पोहचू नये. जर तसे झाले नाहीतर सॅटेलाईटची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

युरोपियन स्पेस एजन्सी ईएसएस मागील पाच वर्षांमध्ये अवकाशातील सॅटेलाईट्सचा कचऱ्यापासून बचावण्याकरिता ३२७१ कोटी रुपये खर्च करण्याची योजना तयार केली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या माहितीनुसार, १९५७ पासून ते आतापर्यंत ५४५० रॉकेट अवकाशात सोडले आहेत. ८९५० सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षात स्थापित केले आहेत.


हेही वाचा – LockDown: उपासमारीमुळे १७ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -