Sputnik V: पुतीन गुप्तहेरांनी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राजेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला, तयार केली कोरोनाविरोधी लस

Russian Spies 'Stole' UK oxford AstraZeneca Vaccine Formula for created sputnik v
Sputnik V: पुतीन गुप्तहेरांनी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राजेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला, तयार केली कोरोनाविरोधी लस

कोरोना महामारीच्या लढाईत जगात पहिल्यांदा रशियाने कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार केली होती. रशियाने जगात पहिल्यांदा स्पुटनिक व्ही नावाची लस तयार केली होती. परंतु स्पुटनिक व्ही लस तयार करण्यासाठी रशियाची कंपनी गॅमेलिया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीवर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. एका वृत्तानुसार ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राजेनेकाची लसीची (Oxford/AstraZeneca) ब्लूप्रिंट रशियांच्या गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर स्पुटनिक-व्ही लस बनवण्यासाठी केला गेला. (Russian Spies ‘Stole’ UK oxford AstraZeneca Vaccine Formula for created sputnik v)

द सनच्या वृत्तानुसार, ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला गेला असून त्याचा वापर स्पुटनिक लसीसाठी गेला आहे, असे ब्रिटनचे मंत्री म्हणाले आहेत. मंत्र्यांनी पुढे सांगितले की, रशियासाठी काम करणाऱ्या गुप्तहेरांनी ॲस्ट्राजेनेका कंपनीकडून कोविशिल्डचे डिझाईन चोरल्याचे पक्के पुरावे आहेत. स्पुटनिक लस तयार करण्यासाठी हे चोरले गेले आहेत.

काही महिन्यांपूर्वीचे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी स्पुटनिक व्ही लस घेतल्याचा दावा केला होता. यादरम्यानच ब्रिटनच्या मंत्र्यांनी कोविशिल्डचा फॉर्म्युला चोरलाचा सांगितले आहे. माहितीनुसार, ऑक्सफोर्डने डिझाईन केलेल्या लसीसारखेच तंत्रज्ञान स्पुटनिक लसीसाठी वापरण्यात आले आहे. ब्रिटनच्या संरक्षण दलाने कॉपी केले होते, हे सुनिश्चित केले आहे. ब्रिटनच्या लसीचा डाटा एका परदेशी एजेंटद्वारे चोरण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान व्लादिमीर पुतीन म्हणाले की, त्यांनी स्पुटनिक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांनी इतर रशियन नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु ही लस अजूनपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विकारली गेली नाही आहे. सध्या ७० देशांमध्ये ही लस दिली जात आहे.

द सनने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये मास्कोत सुरू झालेल्या दोन क्लिनिकल ट्रायलचे परिणाम ब्रिटनच्या जर्नल द लँसेटमध्ये प्रकाशित केले होते. यामध्ये समजले की, रशियाची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. ऑक्सफर्डची लस बनवण्यासाठी ज्या फॉर्म्युलाचा वापर केला गेला आहे, त्याचाच वापर रशियाच्या स्पुटनिकमध्ये केला गेला आहे. रशियाच्या ट्रायलमध्ये फक्त ७६ लोकांचा समावेश होता आणि यामधील फक्त अर्ध्यांना वास्तवात लसीचे डोस देण्यात आले होते.


हेही वाचा – स्वखर्चाने लस घेतली, मग प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवा, हायकोर्टात याचिका दाखल