घरताज्या घडामोडीरशियाने पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, भारताला दिला 'हा' झटका!

रशियाने पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, भारताला दिला ‘हा’ झटका!

Subscribe

सध्या रशियाची आणि पाकिस्तानची जवळीक वाढताना दिसत आहे. रशियाचे सैन्याचे एक पथक गुरुवारी संयुक्त सैन्य अभ्याससाठी पाकिस्तानात पोहोचले आहे. रशिया आणि पाकिस्तानच्या सैन्याच्या या संयुक्त सैन्य अभ्यासाला DRUHZBA-5 असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘पाकिस्तान आणि रशिया दरम्यानचा हा पाचवा
संयुक्त सैन्याचा अभ्यास आहे. हा संयुक्त अभ्यास दोन आठवड्यापर्यंत असेल. दहशतवाद्याचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यातील अनुभव सांगणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे.’

- Advertisement -

पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगच्या म्हणण्यानुसार, ‘या सैन्य अभ्यासात स्काय ड्रायव्हिंग आणि आपल्याला सैनिकांना सोडवणे, अशा प्रकारे अभ्यास केला जाईल. पाकिस्तान आणि रशियाचे संयुक्त सैन्य अभ्यास DRUHZBA दरवर्षी आयोजित केला जातो. २०१६ पासून पाकिस्तान आणि रशिया सैन्याने संयुक्त अभ्यास करत आहे. यामध्ये दहशतवाद्यांविरोधात विशेष सैन्य ऑपरेशन देखील केले जाते.’

दरम्यान रशियाने पाकिस्तानशी सैन्यसोबत भागीदारी केल्यामुळे भारत निषेध नोंदवत आहे. दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानला सहकार्य करणे चुकीचे आहे, असे मत भारताने रशियासमोर वारंवार व्यक्त केले असून यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

रशिया भारताच्या या आक्षेपाकडे दुर्लक्ष करत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पाकिस्तानच्या सैन्याने रशियाच्या असतराखानमध्ये येथे झालेल्या ‘कावकाज २०२०’ सैन्य अभ्यासात भाग घेतला होता. गेल्या वर्षी रशियाच्या सैन्य अभ्यासात सप्टेंबर २०१९ मध्ये पाकिस्तान सहभागी झाले होते. या सैन्य अभ्यासात कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान पण सामील झाले होते.

शीतयुद्धाच्या वेळी रशियाच्या विरोधी गट अमेरिकासोबत पाकिस्तान होता. नवीन जागतिक सुव्यवस्था दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली, जी भारतासाठी चिंताजनक आहे. तसेच सध्या पाकिस्तान आणि रशिया यांच्या सैन्य भागीदारीही अधिक मजबूत होताना दिसत आहे.


हेही वाचा – यामुळे व्लादिमीर पुतिन सोडणार राष्ट्रपतीपद?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -