घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: जगावर आता महागाईचं संकट, रशियाच्या हल्ल्यामुळे 186 देशांची आर्थिक स्थिती...

Russia-Ukraine War: जगावर आता महागाईचं संकट, रशियाच्या हल्ल्यामुळे 186 देशांची आर्थिक स्थिती बिघडली – IMF

Subscribe

रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. युक्रेनच्या विरोधातील युद्धामुळे जगातील बऱ्याच देशांमध्ये आर्थिक परिस्थिती कमजोर होत आहे आणि महागाईचा उच्च दर हा विकासासाठी धोका आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) देण्यात आला आहे. आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या की, ‘रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे 186 देशांच्या आर्थिक परिस्थितीत घसरण झाली आहे. युद्धामुळे ऊर्जा आणि अन्नधान्याच्या जागतिक व्यापार बाधित झाले आहेत. आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये खाण्याच्या सामानात तुटवडा निर्माण झाला आहे.’ दरम्यान पुढच्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ आणि जागतिक बँकची बैठक होणार आहे, त्यापूर्वीच आयएमएफने रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका असल्याचा इशारा दिला आहे.

क्रिस्टालिना जॉर्जिवा पुढे म्हणाल्या की, ‘2020च्या कोरोना महामारीमुळेही जगावर आर्थिक संकट उद्भवले होते. संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. या संकटातून सावरून पुन्हा एकदा रुळावर येत असताना रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आणि यामुळे इतर देशांवर याचे परिणाम होऊ लागले. कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्यामुळे ग्राहकांकडून अचानक वस्तूंची मागणी वाढली होती. पण कंपन्या ही वाढती मागणी पूर्ण करण्यास अयशस्वी झाल्याने महागाई वाढली. या वाढत्या महागाईमुळे विविध देशांतील केंद्रीय बँका व्याजदरात वाढू करू लागल्या आहेत. जर आता रशिया-युक्रेन युद्ध असेच सुरू राहिले तर जगात महागाईचा भडका उडू शकतो आणि देशांवरील आर्थिक संकट गडद होऊ शकते.’

- Advertisement -

दरम्यान जॉर्जिवा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचे भू-राजकीय विभागांमध्ये विभाजन करण्याबाबतही इशारा दिला. एका बाजूला पाश्चिमात्य देश रशियावर निर्बंध लादत, तर दुसऱ्याबाजूला अशात चीनने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हल्ल्याचे समर्थन केले आहे.


हेही वाचा – Mushtaq Ahmed Zargar: मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -