नवी दिल्ली : भारताच्या आधी चंद्राच्या पृष्ठभागावरच लूना-25 नावाचे यान उतरविण्याच्या तयारी असलेल्या रशियाच्या हाती अपयश आले आहे. कारण, रशियाने पाठविलेल्या लूना-25 हे अंतरीक्ष याने चंद्रावर लॅंड होण्याआधीच क्रॅश झाले आहे. तेव्हा आता भारताच्या चंद्रयान-3 या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. (Russias Luna-25 had already crashed on the moon Now the world’s attention is on Indias Chandrayaan3)
भारतापाठोपाठ रशियाच्याची अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने तब्बल 47 वर्षानंतर चंद्र मोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्र मोहिम अयशस्वी ठरली आहे. रशियाने पाठविलेल्या लुना-25 नावाचे अंतराळ यान लॅंडींग होण्याआधीच चंद्रावर क्रॅश झाले आहे. याबाबत रशियाचे अंतराळ संशोधन संस्थेने अधिकृत माहिती दिली आहे.
Russia’s Luna-25 spacecraft has crashed into the moon, reports Germany’s DW News citing space corporation Roskosmos pic.twitter.com/ZtxYkFHUp2
— ANI (@ANI) August 20, 2023
तांत्रिक अडचणीमुळे नाही बदलता आली कक्षा
रशियाच्या लुना-25 हे यान सोमवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. त्यासाठी उतरण्यापूर्वी कक्षा बदलण्यात येणार होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे बदल करता आला नाही. तर 1976 मध्ये, तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या लूना-24 मोहिमेनंतर जवळजवळ पाच दशकांनंतर, 10 ऑगस्ट रोजी लुना-25 अंतराळात पाठवण्यात आले होते. चंद्रावर पोहोचण्यासाठी याने अधिक थेट मार्ग स्वीकारला होता.
हेही वाचा : CWC : काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा; अशोक चव्हण, प्रणिती शिंदेंसह महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश
भारताच्या चंद्रयान-3 कडे जगाचे लक्ष
इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्रोने सांगितले की, मिशन संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. याआधी, चांद्रयान-3 मोहिमेने आजच अंतिम डिबूस्टिंग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून चांद्रयान-3 चे अंतर केवळ 25 किमी इतके कमी झाले आहे. इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
हेही वाचा : चीनच्या घुसखोरीवरून राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाले- ही चिंतेची बाब…
आता प्रतीक्षा फक्त सूर्य उगवण्याची
इस्रोने सांगितले होते की, आता लँडर मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि आता फक्त चंद्रावर लँडिंगच्या निश्चित जागेवर सूर्य उगवण्याची वाट पाहत आहे. इस्रोने सांगितले होते की लँडर मॉड्यूल 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकेल. मात्र, आता त्याच्या लँडिंगसाठी नवीन वेळ जारी करण्यात आली आहे.